श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित निपाणी येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुण्य दिन साजरा!

निपाणी नगरी प्रतिनिधी (10)
कर्नाटकातील सहकार क्षेत्रातील अग्रेसर व कर्नाटक सौहार्द फेडरेशन मधील नामवंत व बेळगाव जिल्ह्यातील अग्रगण्य व निपाणी परिसरातील लौकिक श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित निपाणी या संस्थेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्य दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.
प्रारंभी संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ. सी बी कुरबेट्टी यांच्या हस्ते श्री महात्मा बसवेश्वर, सिद्धेश्वर स्वामी व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या प्रसंगी डॉ म्हणाले की सावित्री बाई फुले यांनी पुण्यामध्ये मुलीची पहिली शाळा सुरु केली त्यामुळे आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आघाडी घेत आहेत. व यशाची उंच शिखरे गाठत आहेत त्यामुळे स्त्रियांचे मनोबल वाढले आहे स्त्रिया पुरुष वर्गाच्या पुढे जाऊन विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत असे सांगितले.
या कार्यक्रमास चेअरमन श्रीकांत परमणे व्हा चेअरमन प्रताप पट्टणशेट्टी, शाखा संचालक डॉ. एस.आर. पाटील, श्री महेश बागेवाडी, श्री सुरेश शेट्टी, श्री किशोर बाली, (सी ए), श्री अशोक लिगाडे, श्री सदानंद दुमाले, श्री सदाशिव धनगर, श्री दिनेश पाटील, श्री प्रताप मेत्राणी, तसेच गुरुवार पेठ महिला शाखा निपाणी, अकोळ रोड महिला शाखा व शिवाजी नगर महिला शाखा याचे चेअरमन, व्हा चेअरमन व संचालिका तसेच सी.ई.ओ. एस. के. आदन्नावर व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजेंद्र मगदूम यांनी केले व उपस्थितांचे आभार सुरज घोडके यांनी मानले.