अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पाळला बलिदान मास!

निपाणी नगरी प्रतिनिधी (10)
अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नेहमीच मुलांना सुसंस्कृत, संस्कारित व मुलांना शिक्षणप्रेमी बनविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.मार्च महिना हा छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ बलिदान मास म्हणून सर्वत्र पाळला जातो .त्याचप्रमाणे अंकुरमच्याही बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा बलिदान मास पाळला होता. त्याचेच औचित्य साधून आज दिनांक 11 मार्च हा छत्रपती व स्वराज्य रक्षक संभाजी महाराज बलिदान दिवस शाळेत विद्यार्थ्यांनी पाळला. यामध्ये पायात चप्पल न वापरणे, एक वेळ अन्न सेवन करणे ,कोणत्याही प्रकारचा मांसाहार न करणे व कोणतेही सण समारंभामध्ये सहभागी न होणे अशा विविध गोष्टी पाळल्या जातात. अंकुरमच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पण हा बलिदान मास पाळला असून आज दिनांक 11 मार्च रोजी म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवशी महाराजांचे फोटो पूजन करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शाळेच्या प्राचार्या सौ चेतना चौगुले यांनी महाराजांचा इतिहास मुलांना समजावून सांगितला. त्याचप्रमाणे बलिदान मासाचे महत्त्वही समजावून सांगितले शिवाय बलिदान मासाचा खरा अर्थ म्हणजे वाईट गोष्टींचा त्याग करावा असेही ह्या चिमुकल्यांना त्यांनी सुचविले. त्या निमित्ताने मुलांनी मोबाईल पासून, वाईट सवयीन पासून लांब रहावे असे त्यांनी सुचविले.
यावेळी शाळेच्या प्राचार्या सौ चेतना चौगुले यांच्या समवेत शाळेचा सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.