Entertainmentआपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

हद्दवाढ स्वीकारू, पण सोयीसुविधा असतील तरच- नगराध्यक्षा सौ सोनल कोठडीया

विशेष सर्व साधारण सभेमध्ये एक मुखी निर्णय! मात्र सभेत सत्ताधारी व विरोधी गटाच्या नगरसेवकांमध्ये विविध विषयांवर शाब्दिक चकमकही उडाली!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (10)

माजी मंत्री व विद्यमान आमदार सौ शशिकला जोल्ले व चिकोडी लोकसभेचे माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या निपाणी शहराचा एकंदरीत विस्तार पाहता अनेक उपनगरे आता चांगल्या प्रकारे विकसित होत असून अनेक पायाभूत सुविधेसह नगरपालिकेने सर्व सुविधा पुरवल्याने विस्तारलेली उपनगरे आता बाळसे धरून शहराच्या विस्तारीकरणाचा एक भाग झाली आहेत. त्यातच आता शासनाने नवीन हद्दवाढ सुचवल्याने नगरपालिकेने विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन योजन केले होते. पण सभेतील चर्चेनुसार निपाणी शहराच्या हद्दीवरील मिळकती विकसित असतील, तर त्या स्वीकारू, अन्यथा ग्रामपंचायतींनी संबंधित मिळकती विकसित करून द्याव्यात. हद्दीवरील काही गावांतील मिळकती पालिकेने हस्तांतरित करून घ्याव्यात, असे शासनाचे म्हणणे असेल तर किमान शासनाने त्यासाठी विशेष अनुदान द्यावे, अशी भूमिका निपाणी पालिकेने घेतली आहे. तसा ठराव सोमवारी (ता. 10) पालिका सभागृहात विशेष सर्वसाधारण सभेत झाला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सोनल कोठडिया होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष संतोष सागांवकर, सभापती डॉ. जसराज गिरे, आयुक्त डी. एस. हरदी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

प्रारंभी आयुक्त हरदी यांनी स्वागत केल्यावर विषय पत्रिकेनुसार सभेला सुरुवात झाली. यावेळी  नुकत्याच निवड झालेल्या नगरसेविका जास्मिन जुबेर बागवान यांचा सभागृहातर्फे स्वागत करण्यात आले. हद्दवाडी सह लष्कर मळा ते यरनाळ या दरम्यानच्या अंतरावर पर्यायी तलाव निर्मितीसाठी डीपीआर अहवाल बनविणे, त्यासाठी कोटोशन मागविणे, म्युनिसिपल हायस्कूल समोर आयडीएसएमटीमधून गाळे निर्मिती अशा विषयांना मंजुरी देण्यात आली.

हद्दवाढीचा विषय आल्यावर सत्ताधारी व विरोधी गटाच्या नगरसेवकांनी मते मांडली. नगरसेवक विलास गाडीवड्डर म्हणाले, शहराच्या सीमेवरील कोडणी, यरनाळ, जत्राट, यमगर्णी, नांगनूर या गावातील काही मिळकती निपाणीत पालिका हद्दीत समाविष्ट होत आहेत. मात्र या मिळकती विकसीत असाव्यात, अन्यथा पालिकेला भुर्दंड सहन करावा लागणार आहे. सध्या मानवतेच्या दृष्टीने पालिका येथे सुविधा पुरवित आहे. ज्या-त्या ग्रामपंचायतींनी किंवा जागा मालकांनी मिळकती विकसीत केल्या कराव्यात, अन्यथा शासनाने निधी द्यावा. राजू गुंदेशा यांनी शहर विकासासाठी अशा मिळकतींच्या सुविधेसाठी शासनाकडून अनुदानासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे सांगितले, रवींद्र श्रीखंडे यांनी मिळकती हस्तांतरीत होणार नसतील तर पालिकेकडून असेसमेंट उतारा का दिला जात आहे, अशी विचारणा केली.

यावेळी संबंधित गावातील मिळकतीचे असेसमेंट उतारा देणे बंद करण्याच्या सूचना सभागृहाने अधिकाऱ्यांना केली. विरोधी गटनेते शेरू बडेघर, एस. एस. चव्हाण यांनी याबद्दल शंका उपस्थित केली. आयुक्त हरदी यांनी संबंधित ग्रामपंचायतींना मिळकती विकसित करण्यासाठी पत्र पाठविले असल्याचे सांगितले. समाधीमठ ते देवचंद महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते कोल्हापूर वेस बोगद्या पर्यंतच्या मार्गावरील पथदिव्यांची दुरुस्ती वरुन सत्ताधारी व विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. जुना पी. बी. रोड पालिकेकडे हस्तांतरीत झाला नसताना दुरुस्ती पालिकेने का करायची? अशी शंका नगरसेविका अनिता पठाडे यांनी उपस्थित केली. दरम्यान नगरसेवक गाडीवड्डर यांनी जुना पी. बी. रोड यापूर्वीच पालिकेकडे हस्तांतरीत झाल्याचे सांगितले. मात्र, तरीही या विषया वरुन सत्ताधारी विरोधकांत खटके उडत राहिले. अखेर जुना पी. बी. रोड पालिकेकडे हस्तांतरीत असेल तरच देखभालीचे काम पालिकेने करण्याचे ठरले. नगराध्यक्षा सोनल कोठडिया यांनीही विरोधकांनी उपस्थित केलेले प्रश्न, विविध शंका यावर आवश्यक तेथे खुलासा केला. नगरसेवक बाळासाहेब देसाई-सरकार, जयवंत भाटले, राजू गुंदेशा, दत्तात्रय नाईक, विनायक वडे, शौकत मणेर, सद्दाम नगारजी, संजय पावले, संतोष माने, अरुण आवळेकर, फारुख गवंडी, नगरसेविका निता बागडे यांच्यासह अरुणा मुद‌कुडे, कावेरी मिरजे, शांती सावंत, गिता पाटील, रंजना इंगवले, सुजाता कदम, प्रभावती सूर्यवंशी, उपासना गारवे, लक्ष्मी बल्लारी यांनी सभेत झालेल्या चर्चेत भाग घेतला.


काही काळ सभागृह वेगळ्या मोडवर…

विशेष सर्वसाधारण सभेमध्ये राजा शिवछत्रपती भवनासाठी 85 लाखाची तरतूद तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी 45 लाखाची तरतूद केली पण आमच्या मुस्लिम समाजासाठी काय केलं असा सवाल विरोधी पक्ष गटनेते शेरू बडेघर यांनी सभागृहाला विचारला. तो विचारलेला प्रश्न मात्र वेगळ्या पद्धतीने विचारल्यामुळे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब देसाई सरकार मात्र थोडे भडकले व त्यांनी आपल्या आवेशपूर्ण आवाजात सभागृहाला उद्देशून व शिरूर बडेघर यांना उद्देशून असे सांगितले कोणाला काय हवे असेल त्यांनी मागून घ्यावे. आम्हाला काय दिले हे विचारायचं नाही. या थोडा वेळ झालेल्या शाब्दिक चकमकीत सभागृह मात्र शांत झाले होते. यामध्ये माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, जयवंत भाटले, राजू गुंदेशा यांनी मध्यस्थी करत वातावरण हलके फुलके केले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!