सौ.भा.शाह कन्या शाळेतील अंगविकल विद्यार्थीनी व क्रीडा शिक्षिका यांचे विविध स्पर्धात यश.

निपाणी नगरी प्रतिनिधी (18)
दि फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ भागिरथीबाई शाह कन्याशाळेतील विद्यार्थीनींनी अंगविकल विद्यार्थीनीच्या स्पर्धेत उज्वल यश संपादन केले.
नुकत्याच निपाणी येथे निपाणी तालुकास्तरीय अंगविकल स्पर्धा पार पडल्या यामध्ये खालील विद्यार्थीनींनी प्राविण्य मिळवले. वेदिका सुनिल चव्हाण (इयता 2 री) गणित व चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक व बुक बॅलन्स स्पर्धेत तृतीय क्रमांक सांची सचिन मोहिते (इयता 6 वी) गणित स्पर्धेत प्रथम क्रमांक नुपूर नागराज गोरखा (इयता 8 वी) व अनुजा शंकर म्हाकवे (इयता 8 वी) यांनी सामान्य ज्ञान स्पर्धेत अनुक्रमे प्रथम व व्दितीय क्रमांक मिळविला. समिक्षा चंद्रकांत खोत (इयता 10 वी) हीने गणित स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.
तसेच नवलिहाळ येथे सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील क्रीडा शिक्षकांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. यामध्ये शाळेतील क्रीडा शिक्षका ए.डी. पाटील यांनी थाळी फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक. गोळा फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक व 100 मीटर धावणे स्पर्धेत व्दितीय क्रमांक पटकाविला.
संस्थेचे चेअरमन श्रीमान आशिषभाई शाह व संचालक मंडळाने विद्यार्थीनीचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका डॉ. एस जे पाटील श्री आर. पी. बामणे व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.