Entertainmentआपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारोह सोहळा संपन्न!

शाळेच्या प्रिन्सिपल सौ.स्नेहा आर घाटगे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (20)

गुरुवार दिनांक 13 मार्च रोजी मॉडर्न इंग्लिश स्कूल मध्ये यंदाच्या वर्षातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारोह पार पडला शाळेच्या प्रिन्सिपल सौ.स्नेहा आर घाटगे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले. तर शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते. अध्यक्ष स्थानावरून बोलताना शाळेच्या प्राचार्या सौ.स्नेहा आर घाटगे यांनी थोर कवि, लेखक विं.दा.करंदीकरांच्या कवितेची आठवण करताना

असे जगावे दुनियेमध्ये..

आव्हानांचे लावूनी अत्तर..

नजर रोखुनी नजरेमध्ये..

आयुष्याला द्यावे उत्तर..

आयुष्याला द्यावे उत्तर… असे सांगत मुलांच्या शालेय जीवनातून झालेली जडणघडण व संस्कार शिदोरी घेऊन उत्तमरीत्या त्यांच्या आयुष्याचा प्रवास हा सुरू करावा. कारण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर पुढचा टप्पा चढणे किती आव्हानात्मक आणि महत्त्वाचे असते हे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. तर विद्यार्थ्यांच्या या वर्षातील स्मृतीला उजाळा देण्यासाठी फोटो अल्बम व्हिडिओ स्वरूपात दाखविण्यात आला. तसेच फनी गेम्स मनोरंजनाचे कार्यक्रमही विद्यार्थ्यांच्या कडून करून घेतले गेले. प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांचा या वर्षाच्या प्रगती बद्दल पारितोषिके देऊन त्यांना गौरविण्यात आले. अनुक्रमे आयडियल गर्ल ऑफ द इयर कु.सई चव्हाण, आर्टिस्ट ऑफ द इयर कु.सुशील बगाडे, बेस्ट डान्सर ऑफ द इयर कु.प्रतीक्षा पाटील आणि कु.शालिनी पाटील, बेस्ट हॅन्ड रायटिंग समृद्धी पाटील,100% अटेंडन्स कु.सानिया मोकाशी, रेसलर ऑफ दि इयर कु.रोहित पाटील, सिन्सिअर बॉईज ऑफ द इयर कु.अवधूत कागले,कु.शिवा मोहिते, सिन्सियर गर्ल ऑफ द इयर कु.तेजस्विनी घोरपडे, डिसिप्लिन स्टुडंट्स ऑफ द इयर कु.दर्शन मारापुरे,कु.तेजस्विनी घोरपडे, हेल्पिंग हँड्स ऑफ द इयर कु.अवधूत कागले, कु.आदित्य खराडे, कु.सक्षम हिरेकुडी, मम्मी का दुलारा कु.अहमद सौदागर, कु.ओमकार माळगे, बेस्ट डॉटर ऑफ द इयर कु.अंजली सावंत, कु.अतिका हलगले अर्न अँड लर्न कु.आदित्य खराडे, दबंग गर्ल ऑफ द इयर कु.स्नेहा कटके, पापा की परी कु. समीक्षा कुंभार, कु.हाफसा बागवान, छुपा रुस्तम ऑफ द इयर कु.अब्दुल धारवाडकर, कु.अनस महात, कु.प्रवीण तमन्नावर, भोलानाथ ऑफ द इयर कु.आदित्य बजेन्त्री, कु.निखिल पाटील,कु.राहुल पावले, कु.स्वयम पाटणकर, गोट्या ऑफ द इयर समर्थ सवदी, अपरिचित ऑफ द इयर कु.अफान पठाण, कन्फ्युज्ड बॉईज ऑफ द इयर कु.अनुप पवार, कु.आर्यन वागळे, कु.चैतन्य कोरवी,कु.श्रीनाथ ऐवाळे, कु.गणेश हंबर, कन्फ्युज गर्ल ऑफ द इयर कु.चैत्राली शेटके, ग्रॅनी ऑफ द इयर कु.गौतमी पाटील, मॅंगो शॉवर ऑफ द इयर कु.अनुष्का बुवा,कु.अथर्व पाटील,कु.सई पाटील, मोटू पतलू ऑफ द इयर कु.गौरव शेटके, कु.विराज जाधव, ईद का चांद कु.वैष्णवी हुल्लोळी, जोडी ऑफ द इयर कु. सुशांत खोत, कु.प्रणय ऐवाळे, अमर अकबर अँथोनी ऑफ द इयर कु.आदित्य खराडे, कु.अवधूत कागले, कु.सक्षम हिरेकुडी, बार्बी डॉल कु. अलिषा कवाटीकर, कु.निशा पाटील, केअरिंग सिस्टर कु. हर्षदा सटले, रेमंड द कम्प्लीट मॅन कु.आदर्श मुगळे,कु. अमोघ कोळकी, चॉकलेट बॉय ऑफ द इयर कु.सिद्धांत माने, पंचरत्न ऑफ द इयर कु.मानसी कांबळे,कु.भक्तीप्रिया एरंडोले, कु.तेजस्विनी घोरपडे, कु.सई चव्हाण, कु. सानिया मोकाशी, टेक्नो ऑफ द इयर कु.सुमित अंकुशे, गोल्डमॅन ऑफ द इयर कु. अबूजार मलिक, सायलेंट बॉईज ऑफ द इयर कु. गणेश लाड, कु.समर्थ चव्हाण, कु.विमलेश वर्मा, सायलेंट गर्ल ऑफ द इयर क. सृष्टी देवाडिगा, बेस्ट डॉटर ऑफ द इयर कु.पल्लवी गायकवाड, गिरगिट ऑफ द इयर कु.सतेज पाटील, चंगू मंगू ऑफ द इयर कु.श्रेया वागळे,कु. हुस्ना रीकीबदार, नियर द चर्च अवे फ्रॉम गाॅड कु.इलियास नदाफ,कु. करण बहादूर, लेट कमर ऑफ द इयर कु.कार्तिकी गायकवाड, कार्टून ऑफ द इयर कु.सानिया मोकाशी, लेझी बॉय ऑफ द इयर कु.अथर्व खडके, मॉस्किटो ऑफ द इयर कु. मोहम्मद साद जकाते, अँग्री बर्ड ऑफ द इयर कु.पृथ्वीराज इंगळे, वॉशरूम लवर्स कु.अरीश मुल्ला, कु.मोहम्मद अझरुद्दीन बारवाडे, कु.मोहम्मद आझम नालबंद, कु.उबेद बडेघर यांना गौरविण्यात आले. तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांनी भावूक होऊन आपल्या शाळेबद्दलचे मनोगत व्यक्त केले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या प्राचार्या सौ.स्नेहा आर. घाटगे सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!