देवचंद महाविद्यालयामध्ये गांडूळ शेतीवर एकदिवशीय कार्यशाळा!
कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणुन राजश्री छत्रपती शाहु महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथील किटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. ए . एस. बागडे हे उपस्थित राहिले!

निपाणी नगरी प्रतिनिधी (21)
देवचंद महाविद्यालयातील कृषी रसायने व कीड व्यवस्थापन विभाग व वनस्पतीशास्त्र विभागामार्फत गांडूळशेती व त्याचे व्यवस्थापन या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा आयोजीत करण्यात आली.
कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणुन राजश्री छत्रपती शाहु महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथील किटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.ए. एस. बागडे हे उपस्थित राहिले. व्याख्याना प्रसंगी त्यांनी रासायनीक खतांचे शेतीतील वापरामुळे होणारे दुष्परिणाम व त्यासाठी उपाय म्हणून केली जाणारी सेंद्रिय शेती याबद्दल माहिती दिली. गांडूळ खताचा केला जाणारा शेतीमधील वापर व त्याचा शेतीला होणारा फायदा तसेच या गांडूळखत निर्मितीची माहिती व त्यासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणारे अनुदान याबद्दल अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले. गांडुळखत निर्मिती प्रकल्प ही नवउद्योजक तरुणीसाठी चांगली योजना असल्याचेही त्यांनी त्यांच्या व्याख्यानात सांगितले.
व्याख्याना प्रसंगी कृषी रसायने व कीड व्यवस्थापन विभागातील प्रा. अमृता गोंधळी यांनी गांडूळखत निर्मिती बद्दल अत्यंत चांगल्या पद्धतीने माहिती दिली यामध्ये गांडूळ खत म्हणजे काय, गांडुळांचे वेगवेगळे प्रकार, गांडूळखत बनविण्याच्या पद्धती, गांडूळ खतासाठी लागणारा कच्चा माल, योग्य ते तपमान, जागेची मांडणी , गांडूळखत तयार होण्यासाठी लागणारा कालावधी, गांडूळखत पॅकेजींग गांडूळ खताचा शेतीमध्ये होणारा वापर व त्यापासून शेतीला मिळणारे पोषक द्रव्ये याबद्दल सखोल माहिती पुरविली व त्याचे प्रात्यक्षिक ही दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. श्रीमती जी. डी. इंगळे उपस्थित होत्या. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सेंद्रिय शेतीमधील गांडूळ खताचे योगदान, गांडूळखत उत्पादन हे अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो. व शेतकरी कुटुंबातील युवकांसाठी अत्यंत चांगले असे नव उद्योगाचे साधन बनू शकते याबद्दल माहिती दिली. सदर कार्यशाळेसाठी एम. एससी भाग एक व दोन चे विद्यार्थी व बी.एस.सीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. किरण आबिटकर यांनी केले, पाहुण्यांचे स्वागत कृषी रसायने व कीड व्यवस्थापन विभागाचे विभागप्रमुख प्रा. पी. डी. शिरगावे यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा. ओंकार कोष्टी यांनी केले व कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने प्रा. सोनाली कुंभार यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी विभागातील प्रा. व्ही.एस. खुडे व कृषी महाविद्यालयाचे डॉ. सोनावणे व इतर कर्मचारी उपस्थित होते.