तालुक्यातील “लव जिहाद” ची प्रकरणे थांबवा – प्रमोद मुतालिक श्रीराम सेना प्रमुख
हलाल मुक्त गुढीपाडवा व श्री राम नवमी साजरी करण्याचे समस्थ हिंदूंना आवाहन!

निपाणी नगरी प्रतिनिधी (24)
तालुक्यातील सर्व माय बहिणीचे लव जिहाद पासून यथोचित संरक्षण करत येणारा चैत्र पाडवा व श्री रामनवमीचा उत्सव सर्व हिंदूंनी हलाल मुक्त पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन श्रीराम सेना कर्नाटक अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी केला.
ते म्हणाले आज आपल्या हिंदुस्थनात आपल्यावर आक्रमण करत अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाचे एका ठराविक समाजाकडून उदात्तीकरण होत असून हे सर्व समाज हिताच्या दृष्टीने घातक असून वेळीच प्रशासनाने योग्य पावले उचलली असती तर तालुक्यात लव जिहादचे प्रकरण देखील घडले नसते.
ते आज निपाणी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेला संबोधित करताना बोलत होते. ते पुढे म्हणाले करजगा तालुका निपाणी सारख्या छोट्या गावातून आपल्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी चिकोडी मध्ये एका फायनान्स कंपनीमध्ये नोकरी असताना एका लक्ष्मी नावाच्या मुली बरोबर लगट करत तिला अनेक आश्वासन देत तिच्यावर अत्याचार करत अल्लाबक्ष नावाच्या एका फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाने त्या महिलेस फसवले असून मागील सहा मार्चपासून निपाणी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊन देखील अजून पर्यंत संशयित ताब्यात घेतला नसल्याने प्रमोद मुतालिक यांनी आश्चर्य व्यक्त केले.
येणारा नववर्षातील चैत्र पाडवा व श्री.रामनवमीचा उत्सव सर्व हिंदूंनी हलाल मुक्त पद्धतीने साजरा करून आपल्या हिंदू धर्माचे पावित्र्य राखण्याचे आवाहन केले.
यावेळी श्रीराम सेना कर्नाटक निपाणी तालुका अध्यक्ष बबन निर्मले, लव जिहाद प्रमुख रवी कोकितकर, विजय आग्रोंळी, अजित पाटील, सचिन तावदारे, बसवराज कल्याणी, अमोल चेंडके, सचिन तावदारे, सचिन मोरे, सुयोग कल्लोळे, जयदत्त काळे, उपस्थित होते.