देवचंद मध्ये असंघटित कामगारांचे हक्क आणि सामाजिक सुरक्षा या विषयावर अधिवेशन आणि राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न!
अधिवेशनाचे बीजभाषक आणि उद्घाटक प्रो.डॉ.शामला दासोग या होत्या!

निपाणी नगरी प्रतिनिधी (25)
देवचंद कॉलेज अर्जुननगर येथे 22 मार्च 2025 रोजी असंघटित कामगारांचे हक्क आणि सामाजिक सुरक्षा या विषयावर शिवाजी विद्यापीठ परिषदेचे 16 वे अधिवेशन आणि राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न झाले. अधिवेशनाचे बीजभाषक आणि उद्घाटक प्रो.डॉ.शामला दासोग या होत्या. त्यांनी बीज भाषणातून असंघटित क्षेत्रातील विविध कामगारांचा व समस्यांचा उल्लेख केला. त्याचबरोबर नोकरीची असुरक्षितता ,शोषण ,पिळवणूक मानसिक ताणतणाव ,आर्थिक तुटवडा आणि वेळेचे बंधन याबाबत ही उहापोह केला.
अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो.डॉ. जी डी इंगळे यांनी असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या समस्या व त्या संबंधित कायदे व त्या कायद्यांची अंमलबजावणी कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले.
शिवाजी विद्यापीठ समाजशास्त्र परिषदेमार्फत दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार देवचंद महाविद्यालयाचे माजी समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा.जे डी कांबळे आणि प्रा. विश्वनाथ पानसकर माजी विभाग प्रमुख समाजशास्त्र विभाग के बी पी कॉलेज इस्लामपूर यांना देऊन गौरविण्यात आले.
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2023 -24 कालावधी मध्ये समाजशास्त्र विषयातील पीएचडी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये डॉ मयुरेश पाटील, डॉ विश्वनाथ तराळ, डॉ संदीप पाटील ,डॉ सुशील कोरटे, डॉ अखिलेश शिंदे यांचा गौरव करण्यात आला. तर प्रो डॉ अर्चना जगतकर लिखित’ जोडीदार निवड: नवे प्रवाह’ या संशोधन पर आधारित पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी शिवाजी विद्यापीठ समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य प्रो.डॉ सतीश देसाई व देवचंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो डॉ.पी पी शाह उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास जलार्पण करून झाली. प्रास्ताविक डॉ.सुषमा जाधव- लिमकर यांनी केले तर पाहुण्यांची ओळख व जीवनगौरव पुरस्कार पत्राचे वाचन डॉ.आनंद गाडीवड्ड यांनी केले. तर आभार डॉ सुप्रिया देसाई यांनी मानले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुजाता पाटील व डॉ अनिता चिखलीकर यांनी केले.
पाच सत्रात संपन्न झालेल्या या चर्चासत्रात प्रो डॉ अर्चना जगतकर यांनी महिलांच्या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची देणे जीवनाची व्यथा मांडली. दुसऱ्या सत्रात डॉ रमेश पाटील यांनी विषयावर विवेचन केले तर तिसऱ्या सत्रात एकूण 82 संशोधन पर शोधनिबंधाचे सादरीकरण केले गेले. यासाठी प्रथम विभागाचे अध्यक्ष डॉ.अर्जुन जाधव तर निवेदक म्हणून डॉ के एम देसाई व दुसऱ्या विभागाचे अध्यक्ष डॉ सरला आरबोळे व निवेदक डॉ शाहू गावडे यांनी काम पाहिले.चौथ्या सत्रामध्ये शिवाजी विद्यापीठ समाजशास्त्र परिषदेची आमसभा संपन्न झाली. तर चर्चासत्राच्या शेवटच्या सत्रांमध्ये सांगता समारंभ पार पडला. उपस्थित प्राध्यापक विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
सदरचे अधिवेशन वर चर्चासत्र यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी जनता शिक्षण मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष श्रीमान आशिषभाई शाह व उपाध्यक्ष डॉ तृप्तीभाभी शाह यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले.