शिरगुप्पी येथे “भव्य ग्रामीण टेनिस बॉल” क्रिकेट स्पर्धा!
कै. पंडितराव रावसाहेब मोकाशी मैदान येथे आकर्षक बक्षिसांसह आयोजन!

निपाणी नगरी प्रतिनिधी (25) शिरगुपी
येथील ग्रामदैवत श्री. थळेश्वर यात्रेनिमित्त व गुढीपाडवा सणाचे औचित्य साधत ग्रामीण भागातील क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! कै. पंडितराव रावसाहेब मोकाशी मैदान, शिरगुप्पी येथे सालाबाद प्रमाणे भव्य ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा शुक्रवार, दि. 28 मार्च 2025 ते मंगळवार, दि. 01 एप्रिल 2025 या कालावधीत खेळवली जाणार आहे. स्पर्धेसाठी ₹2500/- प्रवेश फी ठेवण्यात आली आहे.
स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघांसाठी भरघोस बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
स्पर्धेतील प्रमुख बक्षिसे:—
प्रथम क्रमांक: ₹31,001/-रुपये कै. रामचंद्र परशराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री. बाळकृष्ण रामचंद्र पाटील ( फिजीकल डायरेक्टर गोवा) यांच्याकडून तर विजेत्या संघास आकर्षक चषक श्री. बंडा म्हाकवे (पाटील) यांच्याकडून कै. लक्ष्मी तुकाराम म्हाकवे (पाटील) यांच्या स्मरणार्थ.
द्वितीय क्रमांक: ₹21,001/-रुपये श्री. अमित अजित पाटील श्री. अभिजित बाळासो जाधव श्री. राहूल मनोहर म्हाकवे यांच्याकडून तर विजेत्या संघास आकर्षक चषक श्री. बंडा म्हाकवे (पाटील) यांच्याकडून कै. लक्ष्मी तुकाराम म्हाकवे (पाटील) यांच्या स्मरणार्थ.
तृतीय क्रमांक: ₹5,001/- रुपये श्री. पप्पू पावले यांच्याकडून तर विजेत्या संघास आकर्षक चषक सुरज सुनील व्हरवडे यांच्याकडून कै. अमृत आदी यांचे स्मरणार्थ.
चतुर्थ क्रमांक: ₹5,001/-रुपये श्री. प्रल्हाद देहू कांबळे (सर) यांच्याकडून तर विजेत्या संघास आकर्षक चषक ऋषिकेश सुनील व्हरवडे (फौजी) यांच्याकडून कै. अमृत आदी यांचे स्मरणार्थ.
या विजेत्या संघासह वैयक्तिक बक्षिसे खालील प्रमाणे
प्रत्येक सामन्यासाठी मॅच ऑफ द मॅच– प्रथमेश रविंद्र साळुंखे (साळुंखे इन्फ्रास्ट्रक्चर) यांच्याकडून तर अंतिम सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच – श्री रविंद् सयाजीराव मोकाशी यांच्याकडून व मॅन ऑफ द सिरीज – श्री सुधाकर चंद्रशेखर पाटील व श्री राजेंद्र तुकाराम हजारे यांच्याकडून देण्यात येईल.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी व शिरगुपी व ग्रामीण भागातील तरुणांच्यात खिलाडू वृत्ती निर्माण व्हावी यासाठी त्यांना कार्यप्रेरीत करण्यासाठी मानसिंग दिनकरराव देसाई, जितेंद्र विष्णू तोरसकर, रवींद्र पोळ, मारुती पोवार, राजू कोकाटे, महेश म्हाकवे, सौरभ वाडकर, भोपाल रोड्डे, शिवदास चव्हाण, वैभव म्हाकवे, लौकिक कापसे, सचिन हजारे, निलेश देसाई, दत्ता चव्हाण, सतीश नाईक, स्वप्नील हजारे, सागर ढेरे, सचिन डाफळे, हरीश हजारे, सतीश हजारे, विशाल दरेकर, ऋतुराज पायमल या सर्वांचे सामन्यासाठी विशेष आर्थिक सहकार्य लाभले आहे.
स्पर्धेचे महत्वाचे नियम आणि अटी खालील प्रमाणे राहतील
1.) प्रत्येक सामना 6 षटकांचा राहील 2.) सामना वेळेत सुरू होईल, खेळाडूंनी वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक.3.) एक गाव 11 खेळाडू 4.) सामन्यामध्ये थ्रो गोलंदाजी चालणार नाही. 5.) प्रत्येक खेळाडूंनी आपल्याकडे आधार कार्ड ठेवणे बंधनकारक. 6.) पंचांचा निर्णय अखेरचा मानला जाईल 7.) नांव नोंद करण्यासाठी 50% रक्कम अगोदर जमा करणे बंधनकारक 8.प्रथम 32 संघांना प्राधान्य
नाव नोंदणीसाठी संपर्क:
श्री. विनायक तोरसकर – 9886560097
श्री. राहुल बामणे – 9423452425
श्री सोन्या हजारे -7892800350
श्री .संदीप पाटील-9986414243
स्पर्धेसाठी मीडिया पार्टनर म्हणून निपाणी नगरी.कॉम व निपाणी डायरी यूट्यूब चॅनेल असून अंतीम सामन्याचे हायलाइट्स पाहण्यासाठी @nipanidiary यूट्यूब चैनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन चे बटन दाबण्यास विसरू नका.
https://www.youtube.com/channel/UCVD-SZQ4lWem3FY7M1Hawsg