शिवाजी विद्यापीठाचे नांव सन्मानजनक करा- निपाणीतील समस्त शिवप्रेमी हिंदुत्ववादी संघटनांचे तहसीलदारांना निवेदन!
अधिक सन्माननीय आणि पूर्ण स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे करण्यास सर्व स्तरातून मागणी!

निपाणी नगरी प्रतिनिधी (26)
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपूर्ण उल्लेख असल्याने विद्यापीठाचे नाव अधिक सन्माननीय आणि पूर्ण स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे करण्यात यावे यासाठी 17 मार्च 2025 रोजी हिंदू जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली शिवभक्त समस्त शिवप्रेमी व हिंदू संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा नेण्यात आला होता. तर सदर मोर्चा हा समस्त शिवप्रेमी हिंदुत्ववादी संघटना व शिवभक्त यांच्या भावनांचा विचार करून तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आदर राखून मोर्चा काढण्यात आला होता तर काही दिवसापूर्वीच पुरोगामी विचारसरणीचे लोक व संघटना हे विविध मार्गाने शिवाजी विद्यापीठ हेच नाव असावे असे आंदोलन करून समाजामध्ये द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर असा द्वेष हिंदू समाज व शिवप्रेमी कदापिही सहन करणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव आदरानेच घेतले पाहिजे व विद्यापीठाचे नांव हे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असेच नमूद झाले पाहिजे. या गोष्टीसाठी आमची मागणी कायम राहील व लढा चालूच राहील अशी मागणी श्रीराम सेना कर्नाटक व हिंदू जनजागृती समिती व समस्त हिंदुत्ववादी संघटना निपाणी यांच्याकडून करण्यात आली.
यासाठी आज निपाणी तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी प्रणव मानवी, विजय गोंधळी ,अभिनंदन भोसले ,बबन निर्मले ,अमोल चेंडके ,चारुदत्त पावले ,दादू देवडकर, योगेश चौगुले , निनगुंडा पाटील ,अनिल बुडके., शंकर पाटील, संतोष मोरे, संतोष देवडकर, प्रशांत घोडके, अभिमन्यू भिलुगुडे, उपस्थित होते. निवेदन देताना छत्रपती शिवाजी महाराज की जय ,भारत माता की जय, जय श्रीराम जय जय श्रीराम, अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.