श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेत श्रीरामनवमी उत्साहात साजरी!

निपाणी नगरी प्रतिनिधी (7)
कर्नाटकातील सहकार क्षेत्रातील अग्रेसर व अग्रगण्य व बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध व निपाणी तालुक्यातील नामांकित श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित निपाणी या संस्थेच्या वतीने श्रीरामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ. सी.बी. कुरबेट्टी यांच्या अमृत हस्ते सिद्धेश्वर स्वामी व श्री महात्मा बसवेश्वर व प्रभू श्री राम याच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
डॉ. सी.बी. कुरबेट्टी म्हणाले की प्रभू श्रीराम हे श्रीकृष्णाचा 7 वा अवतार असून सदाचाराने धर्माचे रक्षण करणारा आदर्श राजा होते. आदर्श जीवन कसे असावे हे श्री प्रभू रामाकडून शिकावे श्री प्रभू रामानी नेहमी सत्याचा मार्ग अवलंबला न्यायाचे पालन केले. त्यांनी आपल्या कुटुंबा प्रति राज्या प्रति आणि समाज प्रति आपले कर्तव्य योग्य प्रकारे निभावले असे सांगितले.
या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन श्रीकांत परमणे व्हा चेअरमन प्रताप पट्टणशेट्टी शाखा संचालक डॉ. एस. आर. पाटील, श्री महेश बागेवाडी, श्री सुरेश शेट्टी, श्री किशोर बाली, (सी ए), श्री अशोक लिगाडे, श्री सदानंद दुमाले, श्री सदाशिव धनगर, श्री दिनेश पाटील, श्री प्रताप मेत्राणी, तसेच गुरुवार पेठ महिला शाखा निपाणी, अकोळ रोड महिला शाखा व शिवाजी नगर महिला शाखा याचे चेअरमन व्हा चेअरमन व संचालिका तसेच सी.ई.ओ. एस. के. आदन्नावर व सौ विद्या कमते, श्री महेश शेट्टी, श्री सुरज घोडके, श्री भद्रेश फुटाणे व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ सुजाता जाधव यांनी केले व उपस्थितांचे आभार श्री निलेश चौगुले यांनी मानले.