देवचंद महाविद्यालयात रांगोळी स्पर्धा मोठ्या उत्साहात!

निपाणी नगरी प्रतिनिधी ( 19)
देवचंद कॉलेज अर्जुननगर ता. कागल येथे संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्रीमान आशिषभाई शाह यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत अकरावी कला शाखेतील विद्यार्थिनी कु . मधुरा कुंभार हिने प्रथम क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेत द्वितीय क्रमांक विज्ञान शाखेची रिया घाटगे आणि तृतीय क्रमांक वाणिज्य शाखेची कु. संगीता धडके यांनी मिळवला. या स्पर्धेत कोमल पाटील, मेहक सकवास, प्राजक्ता पाटील, नम्रता मगदूम, अंजली कुंभार, प्रतीक्षा घस्ते ,प्राजक्ता पाटील, श्रेया घोडके ,अनुष्का धुपले, स्वरांजली चौगले ,अश्विनी चांदेकर, ऋग्वेद दावणे ,प्रतीक्षा कुरबेट्टी ,प्रणाली कोपर्डे, संध्या चांदेकर, नम्रता सांगावे याना उत्तेजनार्थ म्हणून बक्षीस व सर्वांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना प्रा. तुकाराम पाटील यांच्याकडून रोख रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात आली. प्रतीक्षा कुरबेट्टी व प्रणाली कोपर्डे या मुलींनी श्रीमान आशिषभाई शाह यांची रांगोळी साकारल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्रीमान आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ.सौ. तृप्तीभाभी शाह ,खजिनदार सुबोधभाई शाह यांची प्रेरणा लाभली. देवचंद महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो.डॉ.जी.डी. इंगळे, उप्रप्राचार्या सौ .एस .पी. जाधव, पर्यवेक्षक डॉ. अशोक डोनर याचे मार्गदर्शन मिळाले. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. कल्पना पाटील व प्रा.अर्चना पाटील यांनी केले .प्रा.नामदेव मधाळे, प्रा. कृष्णामाई कुंभार, प्रा. राणी सोकासने, प्रा. आशा साळुंखे, प्रा. एन. बी. धायारकर, वैभव सोनार, शिवदास चव्हाण, प्रा.सागर परीट व प्रा.विनायक कुंभार यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.