निपाणी महामार्गावर झालेल्या अपघातात ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वार ठार!
गुरुशांत लिंगप्पा हिरेमठ (वय 45) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे!

निपाणी नगरी प्रतिनिधी (8)
ट्रॅक्टर खाली सापडल्याने दुचाकी स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी दुपारी तवंदी घाट येथे झाला. गुरुशांत लिंगप्पा हिरेमठ (वय 45) रा. कडलगे (ता. गडहिंग्लज) जि. कोल्हापूर असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनेची नोंद शहर पोलीसात झाली आहे.
गुरुनाथ हिरेमठ हे गाडी घेवुन आपल्या मूळगावी घेऊन जात होते. ट्रॅक्टर चालक रावसाहेब लगमाणा चोकावी (रा.संकेश्वर) हा तवंदी घाट चढत असताना ट्रॅक्टरचा डावीकडील बाजूचा ब्रेक फेल झाला.
दरम्यान याचवेळी ट्रॅक्टर मागुन दुचाकीवरून जात असलेले मालक गुरुशांत हिरेमठ हे दुचाकीस्वार ट्रॅक्टर खाली सापडले. गंभीर जखमी असलेल्या गुरुशांत हिरेमठ याला उपचारासाठी सरकारी महात्मा गांधीं रुग्णालयात हलविले. दरम्यान प्रकृती चिंताजनक बनल्याने पुढील उपचारासाठी गडहिंग्लज येथे खासगी रुग्णालयात नेत असताना गुरुशांत यांचा वाटेतच मृत्यू झाला. मयत हिरेमठ यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.