“वळीवाने” निपाणीकरांना दिला थोडा दिलासा!
जवाहर तलावाची पाणी पातळी काही अंशी वाढली!

निपाणी नगरी प्रतिनिधी (14)
निपाणीची जलवाहिनी म्हणून ज्या तलावाचा उल्लेख केला जातो त्या जवाहर तलावाची पाणी पातळी मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी 33.8 फुटावर आली होती. त्यामुळे तिसरा हॉल्व्ह देखील खुला करण्याची वेळ आली होती.
दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसापासून वळीवाने डोंगर भागावर कृपादृष्टी झाल्याने जवाहर तलावाला जोडून असलेल्या ओढ्यातील बऱ्यापैकी पाणी जवाहर तलावामध्ये पोहोचत असल्यामुळे काही अंशी निपाणीकरांना पाण्या संदर्भात दिलासा मिळाला आहे. तरी देखील तलावातील पाणी पातळीत दररोज घट सुरू आहे. यामुळे तिसरा व्हॉल्व खुला करावा लागला आहे. पाणी कमी पडणार नाही पण पाणीपुरवठ्याचा दाब घटणार आहे. त्यामुळे शहरवासीयांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन निपाणी नगरपालिका आयुक्त डी.एस हरदी यांनी केले आहे.
तलावातील गाळाचे प्रमाण विचारात घेता 25 ते 26 फूट जलसाठा राहिल्यानंतर पाण्याची कमतरता भासू लागते. जरी अंदमानात नैऋत्य मोसमी वाऱ्याची चाहुल लागली असली तरी. वळीवाणे सध्या तरी काही अंशी पाण्याची समस्या काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात यश मिळवले आहे.