उद्या रविवार (18) निपाणी व परिसरात दिवसभर विद्युत पुरवठा खंडित – अक्षय चौगुले (हेस्कॉम अधिकारी)
त्रेमासीक विद्युत देखभालीसाठी घेतला हेस्कॉमने निर्णय!

निपाणी नगरी प्रतिनिधी (16)
वळीवाच्या पावसाने अगोदरच हजेरी लावून शेतीच्या मशागतीची कामे करण्यास शेतकरी राजाला उसंत मिळाल्याने शेतकरी राजाला थोडा दिलासा मिळालेला आहे. मान्सूनचे आगमन देखील लवकरच होणार असल्याचे संकेत असून वळीवाच्या पावसाने झालेले विद्युत खांबांचे व तारांचे नुकसान व एकंदरीत त्रेमासिक विद्युत देखभालीच्या पूर्ततेसाठी उद्या रविवार दिनांक 18 मे रोजी विद्युत पुरवठा खंडित होणार आहे.
निपाणी हेस्कॉम कार्यालयातील मिळालेल्या परीपत्रका नुसार निपाणी व परिसरातील विद्युत पुरवठा उद्या सकाळी दहा ते सहा या वेळेत पूर्णपणे बंद राहणार असून या काळामध्ये समाधीमठ सब स्टेशन 110 के.व्ही, खडकलाट 110 के.व्ही, जत्राट 33 के.व्ही, बेनाडी 33 के.व्ही, बंद राहणार असून या फिडरचे सर्व त्रेमासिक देखभाल व दुरुस्ती केली जाणार असल्याने विद्युत पुरवठा खंडित केला जाणार आहे. तरी निपाणी व परिसरातील या सबस्टेशनवर अवलंब असणाऱ्या विद्युत ग्राहकांनी काळजी घेण्याची विनंती करण्यात येत आहे.