Entertainmentआपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

मुरगूड विद्यालयाचा दहावीचा निकाल 97.67 टक्के!

सुरभी स्वप्निल शहा या विद्यार्थिनीने मुरगूड केंद्रात दुसरा क्रमांक पटकावला! परिसरातून कौतुकाचा वर्षाव!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी मुरगूड प्रतिनिधी (14)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत येथील शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित, मुरगूड विद्यालय (ज्युनिअर कॉलेज) मुरगुड मधील सुरभी स्वप्निल शहा हिने 97 टक्के गुण मिळवून मुरगूड केंद्रात दुसरा क्रमांक पटकावला. आर्या अनिल पाटील हिने टेक्निकल विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. मुरगुड विद्यालयाचा एकूण निकाल 97.67 टक्के लागला आहे.

शाळेचे गुणवंत विद्यार्थी असे सुरभी स्वप्निल शहा 97.00 टक्के आर्या अनिल पाटील 96.00, टक्के आदिती अनिल पाटील 95.20  टक्के मनस्वी बाजीराव चौगुले 94. 80 टक्के वैष्णवी विलास मेंगाने 94. 60 टक्के,श्रावणी संजय मेटकर 94. 20 टक्के ,वीरेंद्र जयेंद्र कोंडेकर 93.80, टक्के आर्या अरुण सुतार 93.00, टक्के युगांक सुनील पाटील 92.80 टक्के, पूर्वा दीपक कांबळे 92.60, टक्के आर्यन उत्तम शिंदे 92.40 टक्के,अस्मिता रघुनाथ पावले 91.80, टक्के अंतरा विजय बेलवळेकर 91.40, टक्के साक्षी संदीप कापडे 91.20 टक्के श्रुती सर्जेराव भराडे 90.60 टक्के मथुरा संतोष परीट 90.20 टक्के गुण प्राप्त केले आहेत.

एकूण प्रशालेतील 90 टक्के च्या वरती 16 विद्यार्थी उत्तीर्ण, तर 80 टक्के च्या वरती 59 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तसेच 70 टक्के च्या वरती 66 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव प्रा.जयकुमार देसाई, अध्यक्ष शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, चेअरमन डॉ. मंजिरी मोरे देसाई, युवा नेते दौलतराव देसाई, प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे, कौन्सिल मेंबर बाळ डेळेकर, शालेय समिती चेअरमन प्रवीणसिंह पाटील, प्राचार्य एस. पी. पाटील, उपमुख्याध्यापक एस. बी. सूर्यवंशी, उपप्राचार्य एम.डी. खटांगळे, पर्यवेक्षक एस. डी. साठे, पी. बी. लोकरे, शिक्षक प्रतिनिधी एस.जे.कटके, ए.एस.मांगोरे, शिक्षकेतर प्रतिनिधी ए. ए. सावंत, यांचे प्रोत्साहन लाभले तर सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!