निपाणीत आत्ताच झालेल्या अपघातात एक ठार!
श्री रशीद सिकंदर मुजावर वय 42 राहणार आश्रय नगर निपाणी असे मृत व्यक्तीचे नाव आहे!

निपाणी नगरी प्रतिनिधी (20)
राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या निपाणी जवळील हैदराबादी बिर्याणी म्हणजे पूर्वीचे संगम पॅराडाईज हॉटेलच्या समोरील बाजूस कोल्हापूर कडे जाणाऱ्या दिशेस झालेल्या अपघातात एक ठार. सदरचा अपघात सकाळी पावणेदहाच्या दरम्यान झाला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार निपाणी आश्रय नगर पहिली गल्ली येथे राहणारा रशीद सिकंदर मुजावर वय 42 हा हायवे वरील रस्ता क्रॉस करून निपाणीच्या दिशेने येत असता कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मुजावर हे जागीच ठार झाले आहेत. श्री रशीद मुजावर हे निपाणी चिकोडी रोडवरील एका को-ऑपरेटिव्ह संस्थेमध्ये काम करत होते सध्या ते बेळगाव मधील शाखा कार्यालयात कार्यरत होते. आश्रयनगर मधील घराकडून निपाणी कडे कामावर जाताना सदर अपघात झाला आहे. साखरवाडी येथे त्यांच्या मामाचे घर आहे. श्री मुजावर हे अतिशय मनमिळावू व चांगल्या स्वभावाचे गृहस्थ होते.
घटनेची माहिती समजतात पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी व अवताडे पेट्रोलिंगच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करत पंचनामा करत उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह महात्मा गांधी रुग्णालयाकडे पाठवून देण्यात आला आहे. श्री मुजावर यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजय, असा परिवार आहे.