राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी येथील उडपी हॉटेल जवळ झाला अपघात!
शिरगुपीतील निशांत राजू नागांवकर व वैभव आनंदा बोधले यांचा समावेश!

निपाणी नगरी प्रतिनिधी (5)
राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची शृंखला सपता संपत नाही आहे. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार महामार्गावरील उडपी हॉटेल नजीक झालेल्या अपघातात शिरगुपी तालुका चिकोडी येथील दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत.
घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार महामार्गावरील वेदांत पेट्रोल पंप व उडपी हॉटेलच्या पुढील बाजूस झालेल्या अपघातात दोन तरुणांचा समावेश असून दुचाकीवरून मुरगूड बोगद्याच्या दिशेने जात असता रस्त्याचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या कडेला लावलेल्या साईन बोर्डला धडकून झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले आहेत.
श्री निशांत राजू नागावकर व वैभव आनंदा बोधले हे दोघे सायंकाळी साडेसातच्या सुमारास शिरगुपीहुन राष्ट्रीय महामार्गावरून वरती येत मुरगुड बोगद्याच्या दिशेने जात असता महामार्गा लगत असलेल्या बोर्डला थडकल्याने दोघेही खाली पडल्यामुळे किरकोळ अपघात झाला असून दुचाकीचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याचे काम चालू केले आहे. जखमींना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.