Entertainmentआपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

शिक्षणा सोबत संस्कार महत्त्वाचे- प.पू.राम गोविंद प्रभुजी 

निपाणीत हिंदु हेल्प लाईनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (7)

निपाणी येथील दि प्लस अर्बन हॉल मध्ये निपाणी आणि निपाणी तालुक्यातील 60 हून अधिक दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनां परीक्षेमध्ये जास्त गुण प्राप्त केल्याबद्दल त्या विद्यार्थ्यांचा सत्काार सोळा आयोजित केला.

यावेळी इस्कॉनचे पुणे (निगडी) येथील प.पू.राम गोविंद प्रभुजी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी श्रीविरूपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी,प.पू. सदगुरू सच्चिदानंद बाबा व निपाणी मंडळ पोलीस निरीक्षक बि.एस..तळवार यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह, भगवद्गीता देवून आशीर्वादरुपी सत्कार करण्यात आला. प्रारंभी विद्येची देवता सरस्वती देवीचे फोटो पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. श्री तळवार मनोगत व्यक्त करते वेळी म्हणाले की विद्यार्थ्यांनी अभ्यासा सोबत मैदानी खेळाकडे ही लक्ष दिले पाहिजे बुद्धी सोबत मन आणि मनगटही बलशाली केले पाहिजे. शिक्षणा मध्ये उतुंग यश प्राप्त झाल्या वर आपली समाज आणि राष्ट्र या विषयी मोठी जबाबदारी वाढते आपल्या प्रगती सोबत समाज आणि राष्ट्राची प्रगती करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे तसेच तरुणांनी व्यसन, वाईट गोष्टी पासून दूर राहून राष्ट्र निर्मितीच्या कार्यात योगदान द्यावे असे आवाहन केले.

यावेळी प.पू.राम गोविंद प्रभुजी म्हणाले की विद्यार्थ्यांनी ज्ञानग्रहण अवस्थेत फक्त ज्ञानग्रहण करावे. यावेळी टीव्ही मोबाईल पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा व सोशल मीडिया वर आवश्यक तेवढेच सहभागी राहवे. या वयात आपले सर्व लक्ष शिक्षणावर केंद्रित करावे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना आपली भारतीय संस्कृती आपले भारतीय विचार आपल्या आचार तसेच संत महंत क्रांतिकारक यांच्या चरित्र आणून देऊन त्यांच्याकडून ते वाचून घेऊन त्याप्रमाणे आचरण करायला शिकवावे असे मार्गदर्शन केले. यावेळी प.पू.प्राणलिंग स्वामीजी हा जो उपक्रम चालू केला आहे त्या उपक्रमाचे कौतुक केले असे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन केले पाहिजे तसेच शिक्षण घेते वेळी कोणत्याही विद्यार्थ्यांना कसली ही अडचण असेल तर ती अडचण दूर करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी भक्कमपणे सर्व साधुसंत महंत उभे राहतील असा संदेश दिला. 

प. पू. सदगुरू सच्चिदानंद बाबा  म्हणाले विद्यार्थ्यांनी नेहमीच आशावादी रहावे व पालकांनी मुलांच्या कडून जबरदस्तीची अपेक्षा करू नये पालकांनी त्यांच्या शाळेतील शिक्षकान सोबत व त्याचा मित्रा सोबत नेहमीच संपर्कात राहिले पाहिजे व विद्यार्थ्यांना विज्ञाना सोबत अध्यात्माचे महत्व समजावून सांगितले पाहिजे. सागर श्रीखंडे  मनोगत व्यक्त करताना म्हणाले निपाणी मधील साधुसंतांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू हेल्प लाईन च्या वतीने मागील वर्षा पासून परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क घेऊन पास झालेल्या अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा साधू संत महंत यांच्या हस्ते आशीर्वाद रुपी सत्कार करून गौरवण्यात आले आहे. यावेळी हिंदू हेल्प लाईनच्या वतीने निपाणी व परिसरात विविध उपक्रम राबवले जात असल्याचे कार्यक्रमायात अँड. सुषमा बेंद्रे सुचित्रा ताई कुलकर्णी यांनी ही गुणवंत विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री वरद यांनी तर आभार सुनील जनवाडे यांनी मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इस्कॉन सह सदगुरू सच्चिदानंद महाराज सेवा कमिटी, यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमा मध्ये सधर्म चॅरिटेबल ट्रस्ट सेवा,हिंदू हेल्प लाईन निपाणी, गोरक्षण सेवा समिती निपाणी व सकल हिंदू समाज निपाणी यांचे कार्यकर्ते, भक्त मंडळी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते….

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!