यरनाळ मधील महिलेचा विहिरीत पडून मृत्यू!
प्रियांका घनश्याम वड्राळे असे मृत महिलेचे नाव!

निपाणी नगरी प्रतिनिधी (9)
यरनाळ तालुका चिकोडी येथील वड्राळे मळा येथे राहणाऱ्या सौ प्रियांका घनश्याम वड्राळे वय 36 या महिलेचा आज सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान विहिरीत पाय घसरल्याने पडून मृत्यू झाला आहे.
घटनास्थळावरून व ऐकीव मिळालेल्या माहितीनुसार यरनाळ येथील गणपती मंदिर शेजारी असलेल्या कोळकी मळ्याजवळ केळीच्या बागेजवळ असणाऱ्या विहिरीमध्ये प्रियांका ह्या सायंकाळी पाच ते सहा च्या दरम्यान पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. विहिरी जवळील वाटेचा अंदाज न आल्याने पाय घसरून त्यांचा तोल जाऊन विहिरीत पडल्याचे प्रथमदर्शनी समजते. शेतात काम करणाऱ्या कामगारांना सदरची घटना कळल्यानंतर लगेच त्यांना विहिरीतून बाहेर काढून प्रथमोपचार करून घटनास्थळावरून दवाखान्यात घेऊन येत असता वाटेतच त्यांचा बिरोबा देवालयाच्या आसपास मृत्यू झाला.
घटनेचे वृत्त समजताच शहर पोलीस ठाण्याच्या पी.एस.आय उमादेवी गौडा, पोलीस कर्मचारी एस आर कांबळे, बी. एस निरळे यांनी पंचनामा सुरू केला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी महात्मा गांधी रुग्णालयात आणलेला असून पुढील कारवाई चालू आहे. प्रियंका यांच्या पश्चात त्यांचे पती मुलगा प्रतीक मुलगी प्रतिभा सासू-सासरे असा परिवार आहे.
प्रियांका वड्राळे यांना आला होता मागील दहा एक वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका…
सौ.प्रियांका घनश्याम वड्राळे यांना मागील दहा एक वर्षांपूर्वी अर्धांग वायूचा झटका आल्यामुळे त्या सध्या दिव्यांग अवस्थेत आयुष्य कंठत होत्या. त्यातच आज त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचा स्वभाव अतिशय नम्र व मृदू होता.