कोगनोळी श्री दत्तगुरु क्रेडिट सौहार्द संस्थेचे संस्थापक चेअरमन मा.श्री.सचिन आनंदा खोत “युवा व हेल्थ आयकाॅन” पुरस्काराने सन्मानित!

निपाणी नगरी प्रतिनिधी (11)
💥 *मनःपूर्वक अभिनंदन* 💥
कोगनोळी श्री दत्तगुरु क्रेडिट सौहार्द संस्थेचे संस्थापक चेअरमन सामाजिक कार्यकर्ते व दिन दलितांचे कैवारी मा.श्री.सचिन आनंदा खोत* यांना त्यांचा कार्याचा गौरव म्हणून “युवा व हेल्थ आयकाॅन” पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कोगनोळी श्री दत्तगुरु क्रेडिट सौहार्द संस्थेचे संस्थापक चेअरमन” “मा.श्री.सचिन आनंदा खोत”* यांना युवा आयकॉन अवार्ड -2025🎖️ देऊन गौरवण्यात आले. गोवा राज्याचे गव्हर्नर पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्री सचिन खोत यांना हा युवा आयकॉन अवार्ड मिळाल्याबद्दल परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सत्काराला उत्तर देताना निपाणी नगरी डिजिटल वेब पोर्टलच्या प्रतिनिधीशी बोलताना श्री सचिन खोत म्हणाले हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानतो. तसेच या पुरस्काराने मला सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रात काम करण्यासाठी पाठबळ मिळणार असून हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून माझ्या बरोबर काम करणाऱ्या हा सर्वांचा सन्मान आहे असे मी समजतो. तसेच या पुरस्काराने भविष्यात मला काम करण्यास बळ मिळाणार असल्याचे सांगितले.
💥💐💐💐💐💐💥