सौम्या खोत या विद्यार्थिनीने मिळवला तायक्वांदो मध्ये ब्लॅक बेल्ट!
निपाणीतील अधिवक्ता व हुमन राइट्स निपाणी अध्यक्ष सुषमा बेंद्रे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बेल्ट देऊन गौरविण्यात आले!

निपाणी नगरी प्रतिनिधी (12)
जिद्द व चिकाटीच्या जोरावर सौम्याने तायक्वांदो परीक्षेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला आज कालची मुले मुली मोबाईल टीव्ही कम्प्युटर यामध्ये गुंतून राहताना दिसत आहेत त्यामुळे मुलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे तर सौम्या ने या गोष्टीवर मात करून अभ्यास करत गेली 11 वर्षे तायक्वांदो चा सराव करत आहे आज पर्यंत जिल्हास्तरीय 7 सुवर्णपदक तीन रौप्य पदक, राज्यस्तरीय तेरा सुवर्णपदके पाच रौप्य पदक व तीन कास्य पदक पटकावले आहे. त्याचबरोबर खुल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये चार सुवर्ण पदक पटकाविले आहे आज पर्यंत सौम्याने चित्रदुर्ग, दावणगिरी, बेंगलोर, पुणे, मध्य प्रदेश, शिर्डी, रायबाग, या ठिकाणी स्पर्धेला सहभाग होऊन अनेक पदकांची लयलूट केली आहे.
यशस्वी विद्यार्थिनीला निपाणीतील अधिवक्ता व हुमन राइट्स निपाणी अध्यक्ष सुषमा बेंद्रे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बेल्ट देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमावेळी बोलताना बेंद्रे म्हणाल्या आज कालच्या धकाधकीच्या जीवनात असुरक्षित वातावरणामध्ये मुलींना व महिलांना स्वतंत्रपणे वावरणे कठीण बनलेले आहे. त्याचबरोबर दिवसेंदिवस मुलींच्या वर अन्याय होताना दिसत आहेत अनेक मुली लव्ह जिहाद ला बळी पडत आहेत याचे गांभीर्य ओळखून पालकांनी मुलांना योग्य ते मार्गदर्शन करणे त्याचबरोबर आपल्या मुलांच्या कडे लक्ष देणे त्यांना चांगले व वाईट याचे जाणीव करून देणे ही पालकांची जबाबदारी आहे ती पूर्ण करणे खूप गरजेचे आहे. व तायक्वांदो, लाठी काठी, दांड पट्टा, असे आत्मसंरक्षण खेळ शिकून स्वतःचे व देशाचे संरक्षण करण्यास खंबीर राहावे त्याचबरोबर निपाणी भागातील सद्गुरु तायक्वांदो अकॅडमी ही स्वसंरक्षणाबरोबरच देव, देश ,धर्म,संस्कार,सामाजिक जाणीव असलेली एकमेव संस्था आहे असे मनोगत व्यक्त केले व यशस्वी विद्यार्थिनीला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमा वेळी तायक्वांदो अकॅडमी चे मुख्य प्रशिक्षक श्री बबन निर्मले सह परीक्षक देवराज मल्हाडे, प्रथमेश भोसले उपस्थित होते.