Entertainmentआपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

निपाणी सावंत कॉलनीतील समस्या जैसे थे! प्रशासनाचा कानाडोळा!

कॉलनीतील महिलांचे नगराध्यक्षांना निवेदन! पायाभूत सुविधा तरी देण्याची केली मागणी!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (12)

भारतातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा मिळण्याचा संविधानाने अधिकार मिळालेला असून देखील प्रशासन आपल्याकडे कानाडोळा करत आहे. आपण आज स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असताना खेद व्यक्त करत असे म्हणावे लागत आहे की आपल्याला खरंच स्वातंत्र्य मिळाले आहे का? कारण प्रत्येक माणसाला अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजेसह सार्वजनिक सुविधा पुरविण्याचे काम हे त्या भागातील नगर प्रशासनाचे असते पण निपाणी साखरवाडी जवळील विठ्ठलराव सावंत कॉलनीत पायाभूत सुविधांअभावी नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पावसाळ्यात वास्तव्य करणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे तत्काळ या कॉलनीत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन कॉलनीतील महिलांनी बुधवारी (ता. ११) नगराध्यक्ष सोनल कोठडिया यांना दिले.

निवेदनातील माहिती अशी, सावंत कॉलनीतील सर्वच कुटुंबे नगरपालिकेला कर भरतात. याशिवाय विकास शुल्कही भरला जातो. आजतागायत या परिसरात कोणतीही सुधारणा झालेली नाही. परिणामी दैनंदिन जीवन जगणे कठीण आले आहे. गटारीची योग्य व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात पाणी तुंबून, अस्वच्छतेमुळे रोगराई इतर समस्या निर्माण होत आहेत. रस्त्यांची स्थिती खराब असल्याने चालण्यासह वाहनधारकांची गैरसोय होत आहे.

कॉलनीत योग्य पथदीप नसल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना सुरक्षेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वसाहतीत सार्वजनिक उद्यान नाही. याच परिसरात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. उत्तम पाटील यांचे रुग्णालय आहे. येथे दररोज अनेक गर्भवती महिला येतात. परंतु खराब रस्ते, पावसाळ्यात तुंबलेल्या पाण्याने स्त्रियाना त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय कॉलनी परिसरात असलेल्या शाळेस जाण्यासाठी कॉलनीतून रस्ता आहे. पण, खराब रस्त्यांमुळे त्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. नगरपालिका प्रशासनाने समस्येकडे त्वरित लक्ष देऊन आवश्यक ती पावले उचलावीत.

निवेदन स्वीकारल्यावर नगराध्यक्षा सोनल कोठडिया, उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, सर्व नगरसेवकांनी  तात्काळ परिसरात स्वच्छता मोहीम, पथदीप, रस्त्यावर मुरूम टाकण्याची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. प्रतिभा पाटील, राणी जमगौडर, रंजना सोळांकुरे, अंजना हिरवे, संध्याराणी तिप्पे, राणी उपाध्ये, भारती खांडके, बी. पी. खांडके, स्नेहा कुंभार, शिवानंद कुंभार, वरद सोळांकुरे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!