Crime गुन्हाEntertainmentआपला जिल्हाकृषीक्राईमक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात!

विमानातील सर्व 242 प्रवासी मृत्युमुखी! गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा समावेश!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (12)

एअर इंडियाचे विमान ए1-171 या बोईंग विमानाला अपघात झाल्याने एकूण 242 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.‌ विमानात एकूण 242  प्रवासीच प्रवास करत होते. अहमदाबाद ते लंडन हा प्रवास करणार होते. मृत व्यक्तींमध्ये गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा समावेश. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर तीन ते चार मिनिटांमध्ये क्रश झाले आहे. विमानामध्ये अपर्णा महाडिक सुनील तटकरे यांच्या नातेवाईक देखील होत्या. विमानात 11 बालके व दोन नवजात बालकांचा देखील समावेश आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार अपघातातील कोणीही वाचण्याची शक्यता कमी वर्तवली जात आहे.

 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त विमानात 169 भारतीय व 53 ब्रिटिश नागरिक प्रवास करत होते. बी जे मेडिकलच्या होस्टेलच्या मेसवर विमान कोसळले. विमान कोसळल्यानंतर तेथील जेवणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. विमानातील इंधनाची टाकी पूर्ण भरलेली असल्यामुळे मोठी हानी झाल्याचे प्रथम दर्शनी बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून योग्य ती तातडीची मदत करण्याचे प्रशासनास आदेश दिले आहेत. सूत्रांची माहितीनुसार मागील तीन दिवसापासून हे विमान नादुरुस्त अवस्थेत अहमदाबाद एअरपोर्टवर थांबले असताना. आज त्यांनी टेक ऑफ घेण्याची घाई का केली याची चौकशी केली जाणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!