निपाणी नगरी प्रतिनिधी (9)
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त “संघशताब्दी मंथन” कार्यक्रमाचे आयोजन, आज गडहिंग्लज येथे १० मे रोजी होणार वैचारिक संवाद; विविध क्षेत्रातील नागरिकांना उपस्थितीचे आवाहन करण्यात येत आहे.”
देशभरात राष्ट्रकार्य, समाजजागृती आणि विविध सेवाभावी उपक्रमांद्वारे कार्यरत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या शताब्दी वर्षानिमित्त “संघशताब्दी मंथन” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रांत अंतर्गत दक्षिण कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने हा कार्यक्रम रविवार दि. १० मे २०२६ रोजी गडहिंग्लज येथे संपन्न होणार आहे.
“परं वैभवं नेतुमेतत् स्वराज्यम्” हे ध्येय समोर ठेवून संघ स्वयंसेवक समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. संघाच्या कार्याचा अधिक परिचय व्हावा तसेच समाजातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये वैचारिक संवाद घडावा, या उद्देशाने “संघशताब्दी मंथन” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.
हा कार्यक्रम श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्था, टिळक पथ, बँक ऑफ इंडिया शेजारी, गडहिंग्लज येथे सकाळी आयोजित करण्यात आला असून नोंदणी व चहापान सकाळी १० ते ११ या वेळेत होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ ते १२.३० या वेळेत मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे.
कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. श्री. जयंतीभाई भेडेसिया (मा. संघचालक, पश्चिम क्षेत्र) तसेच श्री. सुनील कुलकर्णी (प्रांत बौद्धिक प्रमुख) उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी श्री. भास्करभाई कामत (मा. संघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, दक्षिण कोल्हापूर जिल्हा) राहणार आहेत.
कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.