खेलो इंडिया तायक्वांदो स्पर्धेमध्ये सद्गुरु तायक्वांदो अकॅडमी ने 7 सुवर्ण, 7 रौप्य, 12 कास्य पदकं पटकावली!
प्रशिक्षक बबन निर्मले यांच्या मार्गदर्शनाखाली सद्गुरु तायक्वांदो अँकॅडमीची घोडदौड सुरूच!

निपाणी नगरी प्रतिनिधी (20)
नुकत्याच पार पडलेल्या अस्मिता खेलो इंडिया तायक्वांदो स्पर्धेमध्ये निपाणी येथील सद्गुरु तायक्वांदो अकॅडमीने घवघवीत यश संपादन केले या स्पर्धा स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, गव्हर्मेंट ऑफ इंडिया, इंडिया तायक्वांदो, यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडल्या. या स्पर्धे मध्ये सब ज्युनिअर, कॅडेट, ज्युनिअर ,व सीनियर विभागात आयोजित केल्या होत्या त्याच बरोबर फाईट व पुमसे अशा स्वरूपात स्पर्धा पार पडल्या.
या स्पर्धेमध्ये रुही बोधले ,ब्रींदा कुबसद, दिया तिप्पे, पूर्वा साळुंखे, सोनल लगाडे, नंदिनी सुतार, अदिती मातीवड, पुष्पा पाटील ,अपूर्वा पवार ,लावण्या सावंत ,अनुष्का चव्हाण ,सानिध्य भिवसे, सौम्या खोत, अवनी व्हदडी, अफ्राह पठाण, शुब्रा अक्की, समयरा पठाण, स्नेहल मगदूम ,तनवी धनानंद, आरुषी बोधले, यांनी फाईट व पुमसे विभागात सुवर्ण रौप्य व कांस्यपदक पटकावले तर अंतिम फेरीपर्यंत तनया वाळवे ,मृण्मयी रावण, निधी साठे, यांनी अंतिम फेरीत धडक दिली.
यशस्वी विद्यार्थिनींना श्री समाधी मठाचे मठाधीश परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी, निपाणी टाऊन प्लॅनिंग चे अध्यक्ष संयोजीत (निकु) पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थिनींना प्रशिक्षक बबन निर्मले ,नंदन जाधव, देवदत्त मल्लाडे, प्रथमेश भोसले, आदित्य सोलापूरे, गणेश हुलकंती, ओमकार अलखनुरे, यांचे मार्गदर्शन लाभले.



