मॉडर्न इंग्लिश शाळेमध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सोहळा अगदी जल्लोषात पार पाडला!

निपाणी नगरी प्रतिनिधी (19)
मॉडर्न इंग्लिश शाळेमध्ये १५ ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्य दिन सोहळा अगदी जल्लोषात पार पाडला. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून सिव्हिल इंजिनियर श्री अनिकेत चिले हे उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
आपल्या भाषणातून ते म्हणाले की स्वातंत्र्याची खरी व्याख्या आपल्याला काय करता येईल आणि खरे यश म्हणजे काय आणि हे खऱ्या अर्थाने मिळवताना आपली सर्वतोपरी भूमिका काय असायला हवी आजचा विद्यार्थी हा उद्याचा जबाबदार नागरिक हा स्वतःला कसा घडवू शकतो हे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना शाळेच्या प्राचार्या सौ स्नेहा आर घाटगे म्हणाल्या की प्रत्येकाने आपापल्या परीने व कुवतीने प्रयत्न करत राहणे व त्यातून आनंद मिळवणे हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे.
शाळेचे सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अगदी सकाळी ७ वाजताच शाळेच्या प्रांगणात उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी ध्वजारोहणाची सर्व तयारी केली. शाळेची विद्यार्थिनी कुमारी पूर्वा संग्राम चव्हाण हिने मुख्य अतिथींचा परिचय करून दिला. तसेच कुमारी प्रांजल जिनगे व संस्कृती खराडे या विद्यार्थिनींनी स्वातंत्र्य दिनाचे भाषण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी स्वरा जाधव व सिमरा जमादार या विद्यार्थिनींनी केले तर आभार प्रदर्शन कुमार रुद्र बुवा यांने केले. ध्वजारोहणा नंतर विद्यार्थ्यांनी अनेक गाण्यांचे व नृत्याचे नमुने सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी अतिथींनी सर्व विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले. कार्यक्रमाचा शेवट विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करुन करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मराठा मंडळ बेळगाव संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्री जी नागराजू शाळेच्या प्राचार्या सौ स्नेहा आर घाटगे शाळेतील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.



