विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून शिक्षण घेतल्यास यश दूर नसते- डॉ. विष्णू कंग्राळकर!
मराठा मंडळ फार्मसी कॉलेज निपाणी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात!

निपाणी नगरी प्रतिनिधी (29)
मराठा मंडळ बेळगाव संचलित मराठा मंडळ फार्मसी कॉलेज निपाणी येथे दि. 26 सप्टेंबर रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मराठा मंडळ फार्मसी कॉलेज बेळगावचे प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रमोद पाटील होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्राचार्य प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक आणि स्वागत कु. सुप्रिया मगदूम आणि कु. आलिशा मुजावर यांनी केले तर स्वागत गीत प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींनी गायले.
शैक्षणिक वर्षात झालेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे म्हणाले की विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून शिक्षण घेतल्यास यश दूर नसते तसेच फार्मसीस्टचे सध्याच्या समाजातील महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. कॉलेजचे प्राचार्य प्रमोद पाटील यांनी चालू शैक्षणिक वर्षातील शैक्षणिक सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. आणि तसेच शैक्षणिक वर्ष यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल सर्व शिक्षकांचे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.
कार्यक्रमासाठी मराठा मंडळ बेळगाव संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांचे प्रोत्साहन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अंकिता भोसले, प्रा. शुभम प्रताप, प्रा. प्रणव भोसले, प्रा राजश्री भोपळे, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शुभम प्रताप यांनी केले तर आभार कु. आकांक्षा नाईक यांनी मानले.



