विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वकलेला मिळणार व्यासपीठ!
आय.पी.एस. कोगनोळी विद्यालयात १ ऑक्टोबरला भव्य आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा!

निपाणी नगरी प्रतिनिधी कोगनोळी (29)
विद्यार्थ्यांच्या सुप्त वक्तृत्व कौशल्याला योग्य दिशा देण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी आय.पी.एस. कोगनोळी (सैनिक निवासी संकुल), इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, युवा सायन्स अकॅडमी व आर्ट्स प्रि- मिलिटरी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा मा. सौ. रेखा कुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम दि. १ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता कोगनोळी येथील संस्थेच्या प्रांगणात पार पडणार आहे.
या स्पर्धेत प्राथमिक गट (५ वी ते ८ वी) व उच्च गट (९ वी ते १२ वी) अशा दोन गटांमध्ये स्पर्धा होणार असून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व समकालीन विषय ठेवण्यात आले आहेत. “भारत माझे स्वप्न”, “महापुरुषांचे आदर्श”, “कृत्रिम बुद्धिमत्ता व भविष्याचे जग”, “शिक्षण क्षेत्रा समोरील आव्हाने” अशा विषयांमुळे विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना मिळणार आहे.
पारितोषिकांची आकर्षक रक्कम या स्पर्धेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शना सोबतच प्रेरणादायी स्वरूपातील रोख पारितोषिके देखील देण्यात येणार आहेत.
गट १ (५ वी ते ८ वी):
प्रथम क्रमांक – ₹२,५००/-
द्वितीय क्रमांक – ₹२,०००/-
तृतीय क्रमांक – ₹१,५००/-
उत्तेजनार्थ – ₹१,०००/-
गट २ (९ वी ते १२ वी):
प्रथम क्रमांक – ₹३,५००/-
द्वितीय क्रमांक – ₹३,०००/-
तृतीय क्रमांक – ₹२,५००/-
उत्तेजनार्थ – ₹२,०००/-
रोख रक्कम विद्यार्थ्यांना मिळणारच असून, सहभागी सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेतून दोन स्पर्धकांना संधी असेल, तर वक्तृत्वासाठी ५+२ मिनिटांची वेळ निश्चित करण्यात आली आहे.
स्थानिक पातळीवर उत्सुकता…
या स्पर्धेबाबत निपाणी तालुक्यासह आसपासच्या शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, विद्यार्थ्यांमध्ये तयारीला सुरुवात झाली आहे. अनेक शाळा या निमित्ताने वक्तृत्व कलेसाठी विशेष सराव सत्राचे आयोजन करत आहेत. परीक्षक म्हणून नामांकित मान्यवर उपस्थित राहणार असल्याने स्पर्धा अधिक दर्जेदार होणार आहे.
संपर्क..
या उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी मुख्याध्यापक मा. श्री. अनमोल पाटील (मो. 9922945513, 8971540789) व कोमल पाटील (मो. 8271231446) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



