बेनाडी पीकेपीएसच्या 10 जागांसाठी 19 उमेदवार निवडणूक रिंगणात!
संघाची निवडणूक जाहीर झाली असून, येत्या रविवारी (ता. 5) ला मतदान होणार आहे!

निपाणी नगरी प्रतिनिधी (29)
येथील (पी.के.पी.एस) म्हणजेच बेनाडी विविधोद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाची निवडणूक जाहीर झाली असून, रविवारी (ता. 5) ला मतदान होणार आहे. सोमवारी (ता. 29) अर्ज माघारीच्या प्रक्रियेवेळी दोन अर्ज मागे घेतल्याने 10 जागांसाठी 19 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. दोन उमेदवार मतदानापूर्वीच बिनविरोध झाले आहेत. आता उर्वरीत जागांसाठी रविवारी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. संचालक मंडळातील एकूण 12 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी दोन जागा बिनविरोध झाल्याने आता 10 जागांसाठी लढत होईल. निवडणुकीत सामान्य कर्जदार वर्गातून 5, महिला गटातून 2, ओबीसी ब 1, एसटी 1, एससी गटातून 1 जागांची निवड होईल. एकूण 493 मतदार असून संघाने मतदार यादी आधीच प्रसिध्द केली आहे. अर्ज माघीरी नंतर चिन्हांचे वाटप झाल्याने उमेदवार प्रचाराला लागले आहेत. सत्ताधारी व विरोधी गटात ही निवडणूक होत असून गावकऱ्यांचे लक्ष या लढतीकडे लागले आहे. गोविंदगौडा पाटील निवडणूक अधिकारी म्हणून काम पहात आहेत.
दोन उमेदवार मतदानापूर्वीच बिनविरोध…
दरम्यान, बेनाडी विविधोद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाच्या ओबीसी ‘अ’ गटातून संभाजी पुंडलिक भानसे व बिगर कर्जदार गटातून शहाजी अनिल पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.



