निपाणी मराठा मंडळ हायस्कूलचा संघ फुटबॉल स्पर्धेत प्रथम!
पेनल्टी शूटआऊटमध्ये निपाणी मराठा मंडळाने ५-३ असा विजय मिळवून अजिंक्यपदाची शान राखली!

निपाणी नगरी प्रतिनिधी (30)
निपाणी मराठा मंडळ हायस्कूल, निपाणी यांनी जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून आपले अजिंक्यपद कायम राखले आहे.
संघाचा कर्णधार यश लोहार यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी कागवाड, रायबाग, अथणी, गोकाक या संघांवर मात करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. अंतिम सामना हुक्केरी विरुद्ध निपाणी असा रंगला.
हुक्केरी संघाने एक शून्य अशी आघाडी मिळवली होती; मात्र अखेरच्या ३० सेकंदांत अब्रार सय्यद व अथर्व थोरवत (सोन्या) यांच्या अप्रतिम जुगलबंदीमुळे गोल साधण्यात आला. त्यामुळे सामना १-१ अशी बरोबरीत गेला. त्यानंतर झालेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये निपाणी मराठा मंडळाने ५-३ असा विजय मिळवून अजिंक्यपदाची शान राखली.
⚽ विजयी संघातील खेळाडू
यश लोहार (कर्णधार), अथर्व थोरवत, अब्रार सय्यद,अर्जान पठाण, तेजस माळी, करण चौगुले, वेदांत नागराळे, आदर्श घाटगे, उमराज नगारजी, अथर्व प्रभाळकर, आर्यन कोकरे, समर्थ काटकर, साजिद मकानदार
या विजयी क्षणाचे साक्षीदार म्हणून शारीरिक शिक्षणाचे शिक्षक श्री. जे. आर. खपले, संघ व्यवस्थापक श्री. ए. एम. यादव तसेच मुख्याध्यापक श्री. डी. डी. हळवणकर उपस्थित होते.
विजेता संघाचे मन:पूर्वक अभिनंदन करताना मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. रवींद्र कदम व शिक्षण समितीचे चेअरमन श्री. राजेश कदम यांनी खेळाडूंचे कौतुक करून आगामी विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.



