श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्दच्या कर्मचाऱ्यांना दसरा, दीपावली, सणानिमित्त कर्मचाऱ्यांना मोफत मोबाईल वितरीत!
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विद्यमान चेअरमन श्रीकांत परमणे होते!

निपाणी नगरी प्रतिनिधी (5)
कर्नाटकातील सहकार क्षेत्रातील अग्रेसर व बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित निपाणी या संस्थेच्या वतीने शनिवार दिनांक 04/10/2025 रोजी संस्थेचे मुख्य कार्यालय चिकोडी रोड निपाणी या ठिकाणी संस्थेच्या श्री महात्मा बसवेश्वर सभागृहामध्ये संस्थेच्या कर्मचाऱ्यांना मोफत मोबाईल भेट देण्याचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विद्यमान चेअरमन श्रीकांत परमणे होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सहकाररत्न संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉक्टर सी बी कुरबेट्टी व संस्थेचे व्हॉइस चेअरमन प्रताप एस पटणशेट्टी यांच्या हस्ते श्री महात्मा बसवेश्वर व सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. तसेच संचालक किशोर बाली यांच्या हस्ते फोटोना पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमांमध्ये बोलताना डॉ. सी बी कुरबेट्टी म्हणाले की आज संस्थेचा व्याप वाढला आहे. त्यामुळे सभासद ग्राहकांना तत्पर सेवा पुरवण्यासाठी व आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून आर्थिक व्यवहार अधिक वेगवान करण्यासाठी. सभासद वर्गाला आर्थिक सेवा जलद पुरविण्यासाठी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना मोफत मोबाईल भेट देऊन कर्मचारी व सभासद यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचे आर्थिक नाते निर्माण व्हावे. सभासदाला ठेवी व कर्जे यांचे व्याजदर व कर्जाचा मासिक हप्ता व व्याज, कर्जाची मुदत, सभासद लाभांश, तसेच संस्थेच्या इतर कर्ज व ठेव योजना यांची माहिती तसेच मोबाईल बँकिंग, एनईएफटी आरटीजीएस, एसएमएस, दररोज आर्थिक अर्थव्यवस्थेतील आधुनिक बदल व कर्ज फेड इत्यादी माहिती सभासद ग्राहकांना देण्यासाठी व संस्थेची कर्ज वसुली शंभर टक्के होण्यासाठी.कर्मचाऱ्यांना मोफत मोबाईल वाटपाचा कार्यक्रम पार पडला. संस्थेच्या सभासदांना वेळच्यावेळी आर्थिक माहिती व इतर सेवा जलद मिळाव्यात व त्यांचे काम वेळच्यावेळी व्हावे या उद्देशाने संस्थेने कर्मचाऱ्यांना मोबाईल भेट दिल्याचे सांगितले. कर्मचाऱ्यांना संस्थापक चेअरमन डॉ. सी बी कुरबेट्टी व चेअरमन श्रीकांत परमणे, व्हाईस चेअरमन प्रताप एस पट्टनशेट्टी व संचालक किशोर बाली यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ओपो कंपनीच्या मोबाईलचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास संचालक डॉक्टर एस आर पाटील. सुरेश शेट्टी, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, सदानंद दुमाले, सदाशिव धनगर, दिनेश पाटील, संचालिका पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टनशेट्टी, सि.ई.ओ एस के आदन्नावर, असिस्टंट सीईओ महेश शेट्टी, भद्रेश फुटाणे, विद्या कमते, सुजाता जाधव, सुरज घोडके, महादेव बडगीर व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप गायकवाड यांनी केले. उपस्थितांचे आभार सन्मती भिकनावर यांनी मानले.



