दैनंदिन जीवनात मराठी भाषेला अनन्य साधारण महत्व- प्रा.साळुंखे
अभिजात मराठी भाषा सप्ताह 2025, यानिमित्ताने देवचंद कॉलेजमध्ये ग्रंथदिंडी व ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ विक्री आदी उपक्रमांचे आयोजन!

निपाणी नगरी वृत्तसेवा
समाजाचा राष्ट्राचा विकास करायचा असेल तर सर्वांनी मराठीचे भाषेचा वापर दैनंदिन जीवनात केला पाहिजे व आजच्या विद्यार्थ्यांनी स्वतःला ग्रंथालयाशी जोडून घेतले पाहिजे ग्रंथ वाचनातूनच जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होत असते असे मत मराठी विभागाचे डॉ. साळुंखे यांनी ग्रंथदिंडी व ग्रंथप्रदर्शन व विक्रीच्या निमित्ताने मत व्यक्त केले .
महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर आणि देवचंद कॉलेज अर्जुननगर वरिष्ठ व कनिष्ठ मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी भाषा सप्ताह 2025, यानिमित्ताने देवचंद कॉलेजमध्ये ग्रंथदिंडी व ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ विक्री आदी उपक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी कॉलेजच्या प्राचार्या प्रो .डॉ.जी.डी इंगळे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. आज जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी बोलणारे महाराष्ट्रीयन माणसे आपल्याला आढळतात .आपण स्वतःहून मराठी भाषेचा विकास व प्रसार केला पाहिजे व स्वतःला वाचन चळवळीशी जोडून घेतले पाहिजे असे मत व्यक्त केले. विठ्ठल हरीच्या घोषात ग्रंथदिंडी ही शेजारील बसवान उपनगरात गेली .तेथील ग्रामस्थांनी पाणी घालून ग्रंथदिंडीचे स्वागत केले. त्यानंतर मोहनदाल दोशी विद्यालयाच्या प्रांगणात ग्रंथदिंडीचे आगमन झाले. यावेळी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. एस एम गोडबोले यांनी ग्रंथ दिंडीला पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी तेथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थी पारंपारिक वेशभूषा परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. एन.सी.सी ,एन.एस.एस च्या विद्यार्थ्यांनी ही सहभाग नोंदवला. झिम्मा, फुगडी हा खेळ ही रंगला. यानंतर कॉलेजच्या ग्रंथालयात ग्रंथ दिंडीचे आगमन झाले. तिथे ग्रंथपाल श्री प्रभाकर पोळ यांनी स्वागत केले. या उपक्रमाला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह उपाध्यक्षा डॉ. सौ .तृप्तीभाभी शाह संस्थेचे खजिनदार श्री सुबोधभाई शाह यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. यावेळी पर्यवेक्षक मेजर, डॉ. ए .एस डोनर, आशालता खोत, पी.बी .शिलेदार ,सौ कृष्णामाई कुंभार, विष्णू पाटील, प्रकाश पाटील, शिवाजी कुंभार ,नितीन कोले, प्रवीण सूर्यवंशी वैभव पाटील, बिपिन पाटील, श्रीरंग जबडे, राणी सोकासने, सुधा आरबोळे, आशा साळुंखे, तुकाराम पाटील, नामदेव मधाळे इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



