निपाणी नगरी वृत्तसेवा (30)अर्जुननगर
येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या माजी विद्यार्थी मंडळामार्फत विद्यार्थ्यांसाठी क्रीडा साहित्य भेट देण्यात आले त्यामध्ये -आठ व्हॉलीबॉल ,दोन व्हॉलीबॉल नेट , दोन भाले, दोन थाळ्या,उड्या मारण्या साठीच्या दोऱ्या 24 ,एक वजनकाटा, चार फुटबॉल,असे मिळून एकूण 23,000 हजार रुपये (तेवीस हजार)चे क्रीडा साहित्य तसेच गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके व शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
यावेळी माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष श्री विक्रम घाटगे सचिव आर डी देसाई तसेच संदीप अंगज, मयूर शहा यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापकांनी माजी विद्यार्थी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले व आभार मानले.
सूत्रसंचालन क्रीडा शिक्षिका व्ही. व्ही. पाटील यांनी केले व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक आर डी पाटील आर एस भोसले शिक्षक प्रतिनिधी एस बी यादव कर्मचारी प्रतिनिधी ए व्ही तेली आदी मान्यवर उपस्थित होते.