निपाणी नगरी वृत्तसेवा (3)
दि फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ भागीरथीबाई शाह कन्या शाळेत अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी निपाणी शहर पीएसआय श्रीमती नरसप्पानावर, श्री व्ही एस पुजारी, श्री एल बजंत्री, श्री एम एम देवडी ,श्री आर पी बामणे आदी मान्यवर उपस्थित होते
प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.सौ एस जे पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. यावेळी नरसप्पानावर म्हणाल्या,” आजचा युवक हा उद्याच्या राष्ट्राचे भविष्य आहे पण आजचे अनेक तरुण व्यसनाधिनतेच्या विळख्यात सापडले आहेत. एक अनुभव म्हणून केलेले व्यसन त्यांचे संपूर्ण आयुष्य बिघडवते. अमली पदार्थांच्या सेवनामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडते तसेच त्याचा आपल्या कुटुंब व समाजावर दुष्परिणाम झालेला दिसून येतो. त्यामुळे सर्वच युवकांनी व्यसनापासून दूर राहावे .चांगल्या मुलाशी मैत्री करावी .चांगला अभ्यास करून आपले करिअर उत्तम घडवावे. रस्त्यावरून जाताना सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. तसेच अठरा वर्षाखालील कोणीही मुलाने दुचाकी वापरू नये,”
यावेळी यु बी नागावे एम एम चिकोडे, एस आर इराज, ए. आर. पाटील, व्ही. ए. निगवे, एस. एस. घाटगे, आर. व्ही. मधाळे, आर. आर. सुतार, पी. आर. पाटील, ओ. एम. कुलकर्णी, के.आर. चोपडे.व सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या शेवटी सी एम बाडकर यांनी आभार मानले.