निपाणी नगरी वृत्तसेवा (10)
दि फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ भागिरथीबाई शाह कन्या शाळेत शाळेचा 88 वा वाढदिवस व शालेय मंत्रिमंडळ पदग्रहण व शपथविधी कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी संस्थेच्या संचालिका डॉ. प्रविणा शहा, मुख्याध्यापिका डॉ. सौ. एस. जे. पाटील, श्री आर पी बामणे आदी उपस्थित होते.
प्रारंभी रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक भाषण शाळेचे मुख्याध्यापिका डॉ. सौ एस. जे. पाटील यांनी केले. यावेळी बोलताना डॉ. प्रवीण शाह म्हणाल्या,,” भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया महत्त्वाची असते. लोकशाहीमध्ये नेता निवडीची प्रक्रिया कशी होते याची माहिती मुलींना व्हावी तसेच यावेळी मतदारांची जबाबदारी व अधिकार काय असतात याचा अनुभव मुलांना मिळावा या उद्देशाने त्या निवडणुका घेण्यात आल्या. निवडून आलेल्या सर्व वर्ग प्रतिनिधी तसेच मंत्रिमंडळातील विद्यार्थिनींनी आपल्याला दिलेली सर्व कामे व्यवस्थितपणे पार पाडावीत. शाळेची शिस्त, स्वच्छता राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.”
सर्व विद्यार्थिनींच्या समोर प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. यासाठी प्रत्येक वर्गातून निवडून आलेल्या विद्यार्थिनींनी पंतप्रधान, उपपंतप्रधान व सभापती याच्यासाठी गुप्त पद्धतीने मतदान केले. मतदान केंद्राची सर्व कामे विद्यार्थिनींनीच केली. ओळखपत्र म्हणून सर्वांनी आधार कार्ड वापरले. अपंग व वृद्ध व्यक्तीचे मतदान कसे घेतले जाते याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. सर्वांच्या समोर मतमोजणी करण्यात आली आणि शाळेची पंतप्रधान म्हणून हर्षदा पंडित पोवार व उपपंतप्रधानपदी अभिलाशा आरेश सनदी व सभापती म्हणून श्रद्धा बाळासाहेब पाटील यांची निवड झाली. मान्यवरांच्या उपस्थितीत पदग्रहण व शपथविधी समारंभ पार पडला. शाळेच्या 88 व्या वाढदिवसानिमित्त शाळेत चित्रकला मेहंदी, केसरचना, स्टोन पेंटिंग, लिंबू चमचा, बॉटल गेम आदी स्पर्धा घेण्यात आल्या.
कार्यक्रमास एस आर ईराज, पी आर पाटील ,ओ एम कुलकर्णी, ए आर पाटील, एस एस घाटगे. यु बी नागावे ,एम एम चिकोडे, व्ही ए निगवे, आर व्ही मधाळे, आर आर सुतार, आर चोपडे आदी उपस्थित होते श्री सी एम बाडकर यांनी आभार मानले.