निपाणी नगरी वृत्तसेवा (26)
आज समाजात विकासाचे वारे वाहत असताना रिअल इस्टेट क्षेत्रातील वाढ आणि सार्वजनिक सुविधांचे नियोजन या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. परंतु, नुकतीच घडलेली एक घटना संपूर्ण परिसरासाठी चिंतेची आणि आत्मपरिक्षण करायला लावणारी ठरली आहे. एका उपनगरात जमिनीच्या हद्दीवरून आणि खाजगी मालकीच्या जागेचा वापर रस्ता म्हणुन केला या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान अखेर एका दुर्दैवी संघर्षात झाले.
घटना आणि वस्तुस्थिती:
प्राप्त माहितीनुसार व सूत्रांच्या हवाले, या घटनेत एक रिअल इस्टेट व्यावसायिक साहिल शहा आणि सामाजिक कार्यकर्ते तथा टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु उर्फ संयोजित पाटील यांच्यात जमिनीच्या हद्दीवरून मतभेद झाले. नकाशा हा जमिनीच्या खऱ्या सीमा ठरवण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी असतो. परंतु जागेवरील अतिक्रमण काढण्याची चर्चा सुरू असताना केलेली दांङगाई व अर्वाच्च शिवीगळ यामुळे वाद विकोपास गेला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले असे प्राप्त घटनेवरून वाटते. या दुर्दैवी घटनेत दोन्ही बाजूंचे व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून, सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, या प्रकरणात कोणतीही व्यक्ती फरार नसून, दोन्ही बाजूंनी संबंधित पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद नोंदवली आहे व खरेतर या प्रकरणाची संपूर्ण ऑङीओ व विङीओ क्लिप बघता हे प्रकरण सुतासारखे साधे सोपे आहे हे सरळ सरळ कळेल असे मत साहिल शहा यांनी व्यक्त केले तरी सद्यस्थितीत हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
सारासार विचार आणि आत्मपरिक्षण:
दरम्यान, ही घटना आजच्या समाजासमोर अनेक प्रश्न उभे करते. जागेचा नकाशा सर्वकाही सत्य आणि स्पष्ट ठरवत असतानाही, कोणत्याही वादात हिंसेला किंवा आपल्या शक्तीच्या वापराला स्थान नसले पाहिजे. तात्कालिक संताप आणि संवाद तुटल्यामुळे अशा प्रकारचा वाद होणे अत्यंत दुर्दैवी आहे. एखादा पूर्वनियोजित हल्ला आणि वादाच्या ओघात किंवा अनावधानाने झालेला प्रसंग यात मोठा फरक असतो, परंतु या दोन्ही परिस्थितीं मध्ये हिंसेला स्थान असू शकत नाही. जेव्हा दोन प्रतिष्ठित घटक किंवा व्यक्ती अशा वादात अडकतात, तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण परिसरावर आणि सामाजिक सलोख्यावर होतो.
आजच्या घडीला कायदेशीर मार्ग आणि पोलिसांचा तपास आपली प्रक्रिया पार पाडतच आहे, परंतु यातून मोठा धडा घेणे गरजेचे आहे. जमिनीचे तुकडे किंवा सीमा या माणसांना जोडण्यासाठी असतात, एकमेकांशी लढण्यासाठी नव्हे. कितीही गुंतागुंतीचा प्रश्न असो, तो केवळ आणि केवळ शांततापूर्ण चर्चा, कायदेशीर सुसंवाद आणि परस्पर आदरानेच सोडवला जाऊ शकतो. कायद्यावर आणि संविधानावर विश्वास ठेवून, सामंजस्याचा मार्ग स्वीकारणे हीच आजच्या काळाची खरी गरज आहे.