निपाणी नगरी वृत्तसेवा..(9)
निपाणी मराठा मंडळ संचलित,बालवाडी,मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा व निपाणी मराठा मंडळ हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी निपाणी मराठा मंडळाच्या प्रांगणात खाद्य महोत्सव अतिशय उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निपाणीच्या माजी नगराध्यक्षा सौ. शुभांगी जोशी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून अमृता पंकज पाटील, दर्शना प्रतीक शाह, कोल्हापूरच्या सुवर्णकार माधुरी अनुप चौगुले, तसेच चिकोडीचे उद्योजक श्री. व सौ. पोवार उपस्थित होते. यावेळी मराठा मंडळाच्या शिक्षण समितीच्या संचालिका सौ. ज्योती राजेश कदम, शिक्षण समितीचे चेअरमन श्री. राजेश रघुनाथराव कदम (मालक) हे प्रमुख उपस्थित होते.
या खाद्य महोत्सवामध्ये सुमारे ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी ढोकळा, पाणीपुरी, भेळ, सँडविच, लस्सी, कटलेट, शिरा, उपमा, सोलकढी, ताक, मठ्ठा आदी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ अतिशय चांगल्या पद्धतीने तयार करून विक्रीस ठेवले होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यवसाय कौशल्य, आत्मविश्वास व स्वयंरोजगाराची आवड निर्माण झाली. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या जिद्द, चिकाटी व सादरीकरणाचे तोंडभरून कौतुक करत विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक गुणधर्म दिसून येत असल्याचे मत व्यक्त केले.
खाद्य महोत्सवाबरोबरच कुलिंग आर्ट, पेपर आर्ट व वायर आर्ट यांचे सादरीकरण आयोध्या मोरबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कागद व वायरपासून स्वतः तयार केलेल्या दागिन्यांचे व कलाकृतींचे आकर्षक प्रदर्शन भरवण्यात आले होते. तसेच फक्त खोडरबर व पेन्सिल यांच्या साहाय्याने चित्र कसे साकारता येते, याचे प्रात्यक्षिक श्री. एस. डी. साखळकर सर यांनी दाखवले. रंगीत चित्रांचेही स्वतंत्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांमधील कलागुण विकसित व्हावेत, या उद्देशाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना पेन व वही देण्यात आली, तर पहिल्या पाच क्रमांकांच्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके व सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले. यासाठी पुनम कांबळे मॅडम निपाणी, श्री संतोष पाटील सर सौंदलगा, सदानंद झळके सर, साई ते चायनीज चे मालक पिंटू बोधले यांच्याकडून वह्या पेन ट्रॉफी माजी विद्यार्थिनी स्नेहल नवाळे यांच्याकडून आर्टिफिशियल बुके विद्यार्थ्यांच्या प्रोत्सानासाठी देण्यात आली.
हा संपूर्ण कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमासाठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. डी. डी. हळवणकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. बी. आर. मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमोल पाटील उपस्थित होते.
तसेच हायस्कूल विभागातील ज्येष्ठ शिक्षिका व्ही. व्ही. पत्की,जे. आर. खपले, ए. एम. यादव, के. एल. कांबळे, के. एस. देसाई, अर्चना पाटील, प्रियांका पाटील व लेखनिक मुकुंद कोरे उपस्थित होते.
प्राथमिक विभागातील एस. एस. पाटील, जी. एस. पाटील, पी. एस. घाटगे, एस. बी. कांबळे, व्ही. एस. बुरुड, जे. पी. ढंगे, एस. एस. मोरे, एम. ए. चव्हाण, अश्लेषा केसरकर, विद्यार्थी-शिक्षक व इतर शिक्षकेतर कर्मचारी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.