निपाणी नगरी वृत्तसेवा..(2)
गावकुसाबाहेर आनंदाची चाहूल, शिक्षण, संस्कार आणि संस्कृतीचा संगम अनुभवण्यासाठी ग्रामस्थांना खुले आमंत्रण! शिक्षण खात्याचे अधिकारी, SDMC, ग्रामपंचायत व पालकांच्या उपस्थितीत साजरा होणार स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम व विद्यार्थ्यांचा गुणगौरव
सरकारी उच्च प्राथमिक कन्नड शाळा शिरगुपी येथील शाळेच्या आवारात शुक्रवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता शाळेचा वार्षिकोत्सव (स्नेहसंमेलन) मोठ्या उत्साहात व पारंपरिक ग्रामीण वातावरणात साजरा होणार आहे. गावाची शाळा म्हणजे गावाचं वैभव आणि हा वार्षिकोत्सव म्हणजे संपूर्ण गावाचा सणच असल्याची भावना यानिमित्ताने दिसून येत आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सुशांत मारुती रक्ताडे SDMC अध्यक्ष, KHPS शिरगुपी राहणार असून प्रमुख पाहुणे व शाळेचे सन्माननीय देणगीदार म्हणून श्री. नानासाहेब देसाई यांची उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती (SDMC) उपाध्यक्ष सौ. ऋतुजा कांबळे सदस्य श्री. बाळू कांबळे, श्री. सागर कांबळे, श्री. एकनाथ कांबळे, श्री. संजय ढेरे, श्री. विजय नागांवकर, श्री. रोहित कोकरे, श्री. विनायक पाटील, श्री. विष्णू कांबळे तसेच महिला प्रतिनिधी सौ. वर्षा म्हाकवे, सौ. मनीषा देसाई, सौ. उज्वला नाईक, सौ. स्वाती कांबळे, सौ. अश्विनी नागांवकर, सौ. गीता चव्हाण, सौ. लक्ष्मी सूर्यवंशी आणि श्री. किरण कोकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
याशिवाय शिक्षण विभागातील मान्यवर अधिकारी श्रीमती महादेवी अप्पाजी नाईक (BEO, निपाणी), श्री. आर. ए. कागे (BRC, निपाणी), श्री. एस. एम. पडलाळे (PEO, निपाणी), श्री. सुनिल जनवाडे (ECO, निपाणी), श्री. प्रविण कागे (BRP, निपाणी) तसेच श्री. ए. आर. कदम (CRP, शिरगुपी) हे मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
वार्षिकोत्सवात विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, गीते, नाट्यछटा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणार असून मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, अतिथी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे.
“शाळा आपली – जबाबदारी आपली” या भावनेतून शिरगुपी व परिसरातील पालक, ग्रामस्थ आणि शिक्षण प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शाळा प्रशासन व आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर स्नेहसंमेलनाचे थेट प्रक्षेपण निपाणी डायरी या youtube चॅनलवरून आपणा सर्वांना मोफत पाहता येईल. लवकरच आपल्याला कार्यक्रमाची लिंक पाठवली जाईल.