निपाणी नगरी वृत्तसेवा..(4) संकेश्वर प्रतिनिधी
येथील शंकर नगर येथील आरोपी दर्शन भगवंत हुणश्याळी वय ( २३ ) याने अल्पवयीन मुलीला ( बालिकेला ) प्रेमाचे आमिष दाखवून दुचाकीवरून अपहरण करून अत्याचार ( बलात्कार ) केल्याचे प्रकरण संकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते.
संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवशरण अवजी यांनी आरोपी दर्शन हुणश्याळी याला गजाआड करुन पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.आरोपीची कसून चौकशी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायाधीश श्रीमती सी एम पुष्पलता यांनी साक्षी आधारे भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपी दर्शन हुणश्याळी याला ३० वर्षाचा कडक कारावास १ लाख रुपये दंड,बीएनएस कलम १३७ अंतर्गत आरोपीला ७ वर्षे जादाची कैद आणि २५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर पिडीत बालिकेला जिल्हा कानून सेवा प्राधिकार वतीने ४ लाख रुपये परिहार धन देण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयात पिडीत बालिकेच्या बाजुने सरकारी वकील एल व्ही पाटील यांनी काम पाहिले. सरकारी वकील एल व्ही पाटील यांनी न्यायालयात साक्षीपुरावे मांडून पिडीत बालिकेला न्याय मिळवून देण्याचे कार्य केले बदल पिडीत बालिकेच्या कुटुंबियांतून तसेच संकेश्वरातील महिला वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.