निपाणी नगरी वृत्तसेवा..(9)
निपाणी येथील मराठा मंडळ निपाणी संचलित बालवाडी, मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा व मराठी हायस्कूल येथे आयोजित खाद्य महोत्सवात भारतीय खाद्य संस्कृतीचे ग्रामीण आणि पारंपरिक दर्शन घडणार. चुलीवरची चव, आईच्या हातचं जेवण आणि आपल्या मातीतील पदार्थ यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना या उपक्रमातून समजावून सांगण्यात येणार आहे.
महोत्सवात देशी धान्य, पारंपरिक भाज्या, घरगुती पदार्थ यांची मांडणी करण्यात येणार आहे. भारतीय आहार हा केवळ चवीनं नव्हे तर आरोग्यदायी व संस्कारक्षम असल्याचे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेत पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा अभिमान दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
आज फास्टफूडच्या वाढत्या प्रभावात अशा उपक्रमांमुळे ग्रामीण संस्कृतीची गोडी आणि भारतीय आहाराचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचत असल्याचे चित्र या खाद्य महोत्सवातून स्पष्ट होणार हे नक्की.
विशेष टिप- बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मराठा मंडळ शाळेच्या स्नेहसंमेलनाचा आनंद आपण घरबसल्या घेऊ शकता. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी आत्ताच निपाणी डायरी या यूट्यूब चैनलला सबस्क्राईब करून ठेवा.