निपाणी नगरी वृत्तसेवा (13)
निपाणी मराठा मंडळ संचलित बालवाडी, मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा तसेच निपाणी मराठा मंडळ हायस्कूलचा “विजयोत्सव” वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा अत्यंत भव्य व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आयोजित या कार्यक्रमाने शैक्षणिक व सांस्कृतिक वैभवाचे प्रभावी दर्शन घडविले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आमदार श्री. गणेश हुक्केरी (चिकोडी–सदलगा, बी.डी.सी.सी. बँक नूतन संचालक) हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. लक्ष्मणराव चिंगळे (अध्यक्ष, बेळगाव BUDA व चिकोडी जिल्हा काँग्रेस कमिटी), मा. श्री. रोहन साळवे (उद्योजक व काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष), मा. श्री. पंकज वीरकुमार पाटील (माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष व संचालक, छत्रपती शाहू सहकारी कृषी खरेदी-विक्री संघ, कागल), मा. श्री. संयोजित उर्फ निक अशोकराव पाटील (अध्यक्ष, टाऊन प्लॅनिंग, निपाणी), मा. श्री. सुजय काकासो पाटील (युवा नेते), मा. श्री. रविंद्र रघुनाथराव कदम (अध्यक्ष, मराठा मंडळ निपाणी), मा. श्री. राजेश रघुनाथराव कदम (चेअरमन, मराठा मंडळ शिक्षण समिती, निपाणी व सदस्य – कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी) तसेच सौ. ज्योती राजेश कदम (संचालिका, शिक्षण समिती, मराठा मंडळ) आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. बी. आर. मोहिते, हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. डी. डी. हळवणकर, स्नेहसंमेलनाध्यक्ष श्री. अनिल यादव तसेच उपाध्यक्ष श्री. विशाल बुरुड यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे उपस्थितांची मने जिंकली. देशभक्तीपर गीत, वाघ्या-मुरळी, रामायण, महाभारत, गोंधळ गीत, रेणुका देवी, नवदुर्गा तसेच खेळांवर आधारित सादरीकरणे विशेष आकर्षण ठरली. विशेषतः ‘गोंधळ गीत’ व ‘मल्हारी’ या सादरीकरणांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
────────────────────────
सांस्कृतिक स्पर्धेतील पारितोषिक वितरण (हायस्कूल विभाग)
१) प्रथम क्रमांक – रु. 21,000/-
माजी विद्यार्थिनी सौ. सुरेखा पाटील (इंजिनिअर, इंग्लंड) व श्री. अमित बाचनकर (सीनियर क्वालिटी सुपरवायझर, दुबई) यांच्या हस्ते प्रदान. ‘गोंधळ गीत’ सादर करणाऱ्या स्वागती, संजना, सौजन्या व प्रणाली यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
२) द्वितीय क्रमांक – रु. 15,000/-
टाऊन प्लॅनिंग चेअरमन श्री. निकू पाटील यांच्या हस्ते प्रदान. नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘मल्हारी’ या सादरीकरणाद्वारे हा मान मिळविला.
३) तृतीय क्रमांक – रु. 11,000/-
उद्योजक श्री. संभाजी जामदार यांच्या हस्ते प्रदान. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी ‘रामायण’ या सादरीकरणाद्वारे हा बहुमान पटकावला.
४) चतुर्थ क्रमांक – रु. 7,000/-
श्री. आकाश आनंद पाटील (आनंदराज मोबाईल ) यांच्या हस्ते प्रदान. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी ‘नरसिंह हो छावा’ या सादरीकरणाद्वारे हा बहुमान मिळविला.
५) ‘सतीश शुगर अवॉर्ड’ – रु. 10,000/-
श्री. सचिन पोवार व श्री. राज हिरेकोडी (हॅपी केक) यांच्या वतीने विजेत्या संघाला प्रदान करण्यात आले.
या स्पर्धेसाठी तज्ञ परीक्षक म्हणून श्री. एम. बी. खिरुगडे व श्री. एम. वाय. हेगाजे यांनी राष्ट्रीय स्तरावरील निकषांनुसार परीक्षण केले.
────────────────────────
नृत्य स्पर्धा निकाल (प्राथमिक विभाग)
इयत्ता १ली ते ४थी गट
१) प्रथम क्रमांक – इयत्ता चौथी
गीत: हिरकणी बक्षीस: ₹3000/- (आशिष घाटगे यांच्याकडून) व शिल्ड (हिंदुस्थान फुड्स)
२) द्वितीय क्रमांक – इयत्ता दुसरी
गीत: माझी शाळा बक्षीस: ₹2000/- (रोहित मुर्तुले यांच्याकडून) व शिल्ड (हिंदुस्थान फुड्स)
३) तृतीय क्रमांक – इयत्ता तिसरी
गीत: देशभक्तीपर गीत बक्षीस: ₹1500/- (रोहित संजय पाटील यांच्याकडून) व शिल्ड (हिंदुस्थान फुड्स)
४) उत्तेजनार्थ क्रमांक – इयत्ता चौथी
गीत: अमिताभ स्पेशल बक्षीस: ₹1000/- (राणी चौगुले यांच्याकडून) व शिल्ड (हिंदुस्थान फुड्स)
इयत्ता ५वी ते ७वी गट
१) प्रथम क्रमांक – इयत्ता सातवी
गीत: महाभारत बक्षीस: ₹4000/- व शिल्ड (हिंदुस्थान फुड्स)
२) द्वितीय क्रमांक – इयत्ता सहावी
गीत: रक्तबीज बक्षीस: ₹3000/- व शिल्ड (हिंदुस्थान फुड्स)
३) तृतीय क्रमांक – इयत्ता पाचवी
गीत: शिवकन्या बक्षीस: ₹2000/- v शिल्ड (हिंदुस्थान फुड्स)
४) उत्तेजनार्थ क्रमांक – इयत्ता सहावी व सातवी
गीत: देशभक्तीपर गीत बक्षीस: ₹1000/- व शिल्ड (हिंदुस्थान फुड्स)
या नृत्य स्पर्धेमध्ये प्राथमिक विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्कृष्ट, शिस्तबद्ध व प्रभावी सादरीकरण केले. रंगतदार कार्यक्रमामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय व उत्साहपूर्ण झाले.
────────────────────────
शैक्षणिक गौरव
प्राथमिक विभागात इयत्ता सातवीतील विनायक नामदेव केसरकर यास प्रथम क्रमांका बद्दल गौरविण्यात आले. दहावीची गुणवंत विद्यार्थी दिशा पाचापुरे, श्रीवर्धन टिप्पे, नीलम मुडशिंगे यांचा गौरव करण्यात आला. प्राथमिक विभागातील जनरल चॅम्पियन म्हणून विशाल विनोदकुमार चमार व सादती कृष्णा पोवार यांचा सत्कार करण्यात आला. हायस्कूल विभागात जनरल चॅम्पियन म्हणून यश प्रविण लोहार व हार्दिका सचिन चौगुले यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
माजी विद्यार्थिनी साक्षी विश्वनाथ पाटील (कुरली) हिने शिवाजी विद्यापीठात सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला. होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप श्री. राजू पवार (चिकोडी), श्री. महेश जाधव, श्री. महादेव शिंत्रे (हिंदवी स्पोर्ट्स क्लब, निपाणी) व श्री. पिंटू बोधले (साईतेज चायनीज) यांच्या सहकार्याने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी साऊंड सिस्टिमची व्यवस्था श्री. विनायक पोवार यांनी, स्क्रीन सिस्टिमची व्यवस्था श्री. आदित्य तावडे यांनी, तर यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण पत्रकार श्री. किरण पाटील यांनी केले. मराठा मंडळाचे व्यवस्थापक श्री. अशोक संकाजे, इंस्टाग्राम निपाणीकर झोन, सुप्रिया सुतार, रँडम फोटोग्राफर यांनी मोलाचे सहकार्य केले
संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच आजी-माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.