निपाणी नगरी वृत्तसेवा (7)
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत झोनल बॉक्सिंग स्पर्धा नुकतेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेचे संयोजन गोपाल कृष्ण गोखले महाविद्यालयाने केले होते. सदर स्पर्धेमध्ये देवचंद कॉलेजच्या दोन खेळाडूंनी सहभाग घेऊन रौप्यपदकांची कमाई केली.
१) अथर्व बाजीराव पाटील 65 किलो वजनी गटात रौप्यपदक.
२) आदित्य अनिल दिवटे 90 किलो वजनी गटात रौप्यपदक.
विजयी दोन्ही खेळाडूंची इस्लामपूर येथे होणाऱ्या आंतरविभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विजयी खेळाडूना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. श्रीमान आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह, खजिनदार श्री. सुबोधभाई शाह, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. रमेश साळुंखे, IQAC प्रमुख डॉ. पी. डी. शिरगावे तसेच जिमखानाप्रमुख डॉ. रवींद्र चव्हाण, जिमखाना कर्मचारी श्री. वैभव सोनार, श्री. अनंत घोळवे यांचे मार्गदर्शन लाभले.