निपाणी नगरी वृत्तसेवा (10)
टीम नेसा (Nipani Endurance Sports Association) आयोजित सहाव्या गोल्ड प्लस निपाणी रासाई हिल मॅरेथॉन २५ स्पर्धेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी ही स्पर्धा रविवार, दि. १३ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार होती. मात्र, आता ही स्पर्धा रविवार, दि. २० डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे.
निपाणी येथील व्यायामशाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात येणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये ५ किमी, १० किमी आणि २५ किमी अशा तीन गटांत धावपटूंना सहभागी होता येणार आहे. गोल्ड प्लस फ्लोट ग्लास लिमिटेड यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेत दरवर्षी मोठ्या संख्येने धावपटू सहभागी होतात.
स्पर्धेसाठी यापूर्वी नोंदणी केलेल्या धावपटूंची नोंदणी नवीन तारखेसाठी ग्राह्य राहणार आहे. ज्या धावपटूंनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी www.teamnesa.com या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन टीम नेसाच्या वतीने करण्यात आले आहे.
निपाणी परिसरात धावण्याची संस्कृती रुजविणे, आरोग्याबाबत जनजागृती करणे आणि नवोदित धावपटूंना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. स्पर्धेच्या तारखेत झालेल्या बदलाची धावपटू, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.