निपाणी नगरी वृत्तसेवा (5)
देवचंद कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल 90.11% लागला असून विज्ञान विभागाचा 95.94% तर कला विभागाचा 84.69% तर वाणिज्य विभागाचा 82.40% लागला. कु.पूर्वा श्रीधर कुलकर्णी हिने विज्ञान शाखेत 91% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला तर द्वितीय क्रमांक कु. दीप्ती दिगंबर खाडे हिला ८२.८३ टक्के गुण मिळाले .तृतीय क्रमांक कु. विपुल बाबुराव चौगुले याला 81 टक्के गुण मिळाले. कला शाखेमध्ये कु. सई विनायक रानमाळे 86.33% गुण मिळून कॉलेजमध्ये प्रथम आली. द्वितीय क्रमांक कु. मधुरा मलिशा कुंभार, हिला 84.33% मिळाले. तर कु.पृथ्वीराज अरुण गिरी याला ७८.८३ टक्के मिळाले. वाणिज्य शाखेमध्ये कु समृद्धी राजेंद्र नादवडेकर हिने 87.67% गुण मिळवून कॉलेजमध्ये प्रथम आली, तर द्वितीय क्रमांक कु. समीक्षा संदीप कोले हिला 87% तृतीय क्रमांक कु.श्रेया राजेंद्र सुतार हिला 85% गुण मिळाले आहेत. एम .सी. व्ही.सी विभागाचा निकाल शंभर टक्के लागला असून यामध्ये कु. गायत्री विश्वनाथ पाटील हिला 85.50% टक्के गुण मिळवून प्रथम आली. तर द्वितीय क्रमांक कु. श्रद्धा आनंदा जाधव हिने 83.50% गुण मिळवले, तर कु.समीक्षा तुकाराम पाटील हिला 82.17% गुण मिळाले.
यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचे जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्रीमान आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ. सौ तृप्ती भाभी शाह तसेच संस्थेचे खजिनदार श्री सुबोध भाई शाह महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ.जी. डी. इंगळे उपप्राचार्या सौ. एस. पी. जाधव पर्यवेक्षक डॉ. मेजर अशोक डोनर यांनी हार्दिक अभिनंदन केले.