निपाणी नगरी वृत्तसेवा (13)
ज्ञान, संस्कार आणि गुणवत्तेच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ग्रँड सायन्स अकॅडमीचा ६ वा वर्धापन दिन रविवार, दि. १६ ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असून, विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यासोबतच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देण्याचा हा विशेष सोहळा ठरणार आहे.
निपाणीतील बाबा लॉन, देवचंद कॉलेजसमोर, मुरगूड रोड येथे सकाळी ९ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सुप्रसिद्ध व्याख्याते मा. श्री. युवराज दादासो पाटील उपस्थित राहणार असून, त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून ग्रँड सायन्स अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. युवराज पाटील उपस्थित राहणार आहेत. यावेळी अकॅडमीच्या विविध उपक्रमांतून उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक व सत्कार करण्यात येणार आहे.
Medical, IIT-JEE आणि Foundation या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच ज्ञान, संस्कार आणि गुणवत्तेचा पाया मजबूत करण्यासाठी ग्रँड सायन्स अकॅडमी सातत्याने प्रयत्नशील आहे. सहा वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा हा टप्पा विद्यार्थ्यांसह पालक, प्राध्यापक आणि कर्मचारी वर्गासाठीही अभिमानाचा क्षण ठरणार आहे.
या आनंदसोहळ्यास सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक व हितचिंतकांनी आवर्जून उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन करावे, असे आवाहन ग्रँड सायन्स अकॅडमीच्या वतीने करण्यात आले आहे.