निपाणी नगरी वृत्तसेवा (10)
भारत स्काऊट गाईड कर्नाटक यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्काऊट राज्य पुरस्कार परीक्षेत श्री जी.एम संकपाळ प्राथमिक व हायस्कूल श्रीपेवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. या शाळेतील विद्यार्थी मंथन जगदाळे ;विवेक पाटील ;समर्थ पाटील ;अवधूत जलपुरे व स्वयं पाटील या विद्यार्थ्यांनी प्रथम सोपान, द्वितीय, सोपान तृतीय सोपान व राज्य पुरस्कार परीक्षा उत्तीर्ण होऊन कर्नाटक राज्याचे राज्यपाल श्रीयुत थावरचंद गेहलोट यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
आज भारत स्काऊट गाईड कर्नाटक चे मुख्य आयुक्त व माजी मंत्री माननीय श्री पी जी आर सिंधिया यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन डॉ अशोक पुजारी, सर्व संचालक मंडळ ,मुख्याध्यापक, श्री जे एस जाधव व श्री एस डी पोवार स्काऊट व गाईड मार्गदर्शक श्री एस आर मगदूम, श्रीमती के ए बुजरे, श्री ए आर झिनगे, श्रीमती आर आर बाकळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व स्काऊट आणि गाईडचे सर्व विभाग प्रमुख यांनी अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.