निपाणी नगरी वृत्तसेवा (21)
कर्नाटकातील सहकार क्षेत्रातील अग्रेसर आणि निपाणी तालुक्यातील प्रसिद्ध श्रीकृष्ण मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीची 23 वी वार्षिक सर्व सभा संस्थेच्या कार्यालयामध्ये संपन्न झाली .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष शरद चौगुले होते.
कार्यक्रमाचे प्रारंभी संस्थेचे चेअरमन सागर पाटील यांच्या हस्ते गावचे ग्रामदैवत श्री ब्रम्हनाथ यांच्या चरणी पुष्पहार घालून श्रीफळ वाढवण्यात आले.
त्यानंतर सभेच्या अध्यक्षांचा सत्कार संस्थेचे चेअरमन सागर पाटील व व्हाईस चेअरमन शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते शाल श्रीफळ व मोमेंटो देऊन करण्यात आला. संस्थेचे संचालक महादेव चौगुले यांनी विषय पत्रिकेचे वाचन व संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. संस्थेने चालू वर्षी 76000/हजार लिटर म्हैस दूध संकलन व गाय 45000/लिटर केल्याचे सांगितले तसेच संस्थेकडे 200/सभासद असून एकूण निधी 30 लाख व दिनांक 31/03/2026 अखेर संस्थेस 2 लाख 60 हजार नफा झाला असून वार्षिक उलाढाल 2 कोटी 50 लाख झाल्याची सांगितले
तसेच सेक्रेटरी विलास गायकवाड यांनी सभासदांना 10% लाभांश व दूधउत्पादकांना 10% दीपावल ला बोनस दिल्याची सांगितले.
संस्थेच्या संचालक मंडळाच्या हस्ते उपस्थित मान्यवर सभासद विविध संघ संस्थांचे पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास संचालक पांडुरंग मंगसुळे, कालिदा शिंगे, रामगोंडा चौगुले, सर्जेराव चौगुले, संचालिका छबा भिवशे संजीवनी बस्तवडे, सभासद सदाशिव पाटील दीपक पाटील बाळासो पाटील भीमराव पाटील कृष्णा पाटील कृष्णा सुतार रमेश बस्तवडे, सुभाष पाटील, दादासो पाटील, अजित मंगसुळे, कलगोंडा पाटील, दत्ता भिवशे सुरज चौगुले, ग्रामस्थ विद्याधर मजगे, विजय पंचम फाकडू कदम, आप्पासो नलवडे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप गायकवाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार संचालक सिद्धगोंडा पाटील यांनी मांडले.