निपाणी नगरी वृत्तसेवा (29)श्रीपेवाडी
येथील श्री जी. एम. संकपाळ प्राथमिक व हायस्कूल, श्रीपेवाडी येथे संस्थेच्या संस्थापिका कैलासवासी मैनाबाई संकपाळ यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्व विद्यार्थ्यांसाठी नंदादीप नेत्रालय यांच्या सहकार्याने मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि त्यांच्या डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरला.
संस्थेच्या संस्थापिका कैलासवासी मैनाबाई संकपाळ यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा वारसा जपण्याच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
या प्रसंगी प्राथमिक शाळेचे व हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री जे.एस जाधव व श्री एस डी पोवार, नंदादीप नेत्रालयचे कर्मचारी तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. नंदादीप नेत्रालयच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी करून या उपक्रमात मोलाचे सहकार्य केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने शाळेने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.