निपाणी नगरी वृत्तसेवा (23)
हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या तज्ञ संचालक पदी भोज येथील सुपुत्र डॉ. सुदर्शन मुराबट्टे यांची निवड झाली आहे. सहकार क्षेत्रात त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण व पारदर्शक कार्याची दखल घेऊन त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
या निवडीबद्दल श्री दत्तगुरु को-ऑपरेटिव्ह सोसायटी नियमित, निपाणी – शाखा भोज यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. सुदर्शन मुराबट्टे हे दत्तगुरु सोसायटीच्या भोज शाखेत सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेने उल्लेखनीय प्रगती केली आहे.
सन्मान सोहळ्याचे आयोजन भोज शाखेच्या कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. निलेश खोत आणि मुख्य व्यवस्थापिका सौ.विदुला हेगडे यांच्या हस्ते डॉ. सुदर्शन मुराबट्टे यांना पुष्पगुच्छ, श्रीफळ व शाल देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी बोलताना चेअरमन निलेश खोत म्हणाले, “डॉ. सुदर्शन मुराबट्टे यांची तज्ञ संचालकपदी झालेली निवड ही केवळ त्यांचा वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण दत्तगुरु परिवाराचा गौरव आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्चितच शेतकरी आणि साखर उद्योगाला होईल.”
या कार्यक्रमास संस्थेच्या संचालक मंडळातील परगौडा पाटील, शितल पाटील, बाबासाब पाटील, संजय माळी, दिलीप शिंत्रे, पवन कुमार टारे, भरत अकिवाटे, प्रवीण हणबर, सुहास ममदापुरे, मोहन सिदगौडा पाटील, हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
तसेच शाखेचे व्यवस्थापक अमित पाटील, विवेक बन्ने राकेश मुराबट्टे कर्मचारी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाखा व्यवस्थापक अमित पाटील यांनी केले. डॉ. सुदर्शन मुराबट्टे यांच्या या निवडीमुळे भोज परिसरात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे